E-Rupee UPI Payment : मित्रानो, UPI Payment चा वापर तर तुम्ही नक्कीच करत असाल. UPI मुळे खरोखर जीवन सोपं झालं आहे. यामुळे हातात भलंमोठं पैश्याचं बंडल घेऊन जाण्याची भीती नाही. मोबाईलवरचा हा व्यवहार सुटसुटीत आणि सोपा आहे. UPIच्या या वाढत्या वापरामुळे दिवसेंदिवस यात बदल घडत आहेत, UPI Payment अजून सुरक्षित व हटके व्हावं यासाठी नवनवीन प्रयोग सुरु आहेत. यातलाच एक नवीन प्रयोग म्हणजे आता E-Rupee च्या माध्यमातून युपीआय पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही बँकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काय आहे E-Rupee? E-Rupee UPI Payment
वर्ष 2022-23 मध्ये केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून E- Rupee ची घोषणा करण्यात आली होती. तर E- Rupee नेमका काय आहे? जे पैसे आपण खिश्यात घेऊन फिरतो त्याएवजी त्याचा डिजिटल चलनाचा वापर करणे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या Central Bank Of Digital Currency(CBDC) ने या इलेक्ट्रिक चलनाची सुरुवात केली. या चलनाचे रुपया ठोका आणि रुपया रिटेल असे दोन प्रकार आहेत. या प्रकारानुसार त्यांचा वापर करण्यात येतो.
कसा कराल E-Rupee चा वापर ?
बँक कडून E-Rupee चा वापर करण्याचे निमंत्रण दिले असल्यास तुम्ही याचा वापर करू शकता. याचा वापर स्मार्टफोन वरून करता येतो.
१) ज्या व्यक्तींना या साधनाचा वापर करायचा आहे त्यांनी Google Play Store किंवा Apple iOS वरून E-Rupee हे एप डाउनलोड करावे.
२) इथे मोबाईल नंबर सह नोंदणी करावी लागते. ज्या मोबाईल मध्ये APP आहे तोच मोबाईल नंबर रजिस्टर असणे भाग असते.
३) या नंतर एक PIN किंवा Fingerprint निवडावा लागतो.
४) Send, Collect, Load,Reedem या चार पर्यायांमधून load या पर्यायाची निवड केल्यानंतर रक्कम Digital Wallet मध्ये होईल, QR कोड स्केन करून UPI payment चा वापर करता येतो, मात्र ईथे रक्कम तुमच्या बँक अकौंट मधून कापली जात नाही तर digital वॉलेटमधून घेतली जाते.
या बँकांनी स्वीकारली E-Rupee ची UPI Payment:
भारताने सुरु केलेली UPI Paymentची सुरुवात जगभरात डंका वाजवत आहे. देशातील अनेक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये आता UPI ची सोय जोडलेली आहे. नवीन आलेली ही E-Rupee ची सुविधा नक्कीच भर पडणारी असणार आहे. या पेमेंट ऑप्शनचा (E-Rupee UPI Payment) अनेक बँकांकडून स्वीकार करण्यात आला आहे. ज्यात State Bank Of India, Panjab National Bank, HDFC Bank, Bank Of Baroda यांचा समावेश आहे. या सर्व बँकांनी E-Rupee द्वारे UPI Payment करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे व याला Interoperability असे नाव देण्यात आले आहे. इथे UPI QR Code स्कॅन करून payment करता येतं.