Business Idea : सध्याच्या मंदीच्या काळात ‘ही’ कामे करून दरमहा मिळवा भरपूर पैसे

बिझनेसनामा । सध्या ट्विटर, मेटा आणि अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत असल्याच्या बातम्या सतत कानावर पडत आहेत. यानंतर आता जगभरात मंदीची भीती आणखी गडद झाली आहे. मात्र यासाठी घाबरून जाण्याची नाही तर काहीतरी नवा विचार करण्याची गरज आहे. जर आपण नोकरी करत असाल आणि त्यासोबतच कमी गुंतवणुकीच्या एखाद्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आज या बातमीद्वारे आपण त्याविषयी जाणून घेउयात…

ऑनलाइन क्लासेस

जर आपल्याला एखाद्या शैक्षणिक विषयात रस असेल तर आपल्या आवडीचा हा विषय आपल्याला भरपूर उत्पन्न मिळवून देईल. हे लक्षात घ्या कि, कोरोना काळापासून ऑनलाइन क्लासेसचा ट्रेंड खूपच वाढला आहे. तसेच भविष्यातही ऑनलाईन क्लासेसचा विस्तार हळूहळू वाढताना दिसत आहे. म्हणून ऑनलाइन क्लासेस सुरू करून आपल्याला चांगली कमाई करता येऊ शकेल. यासाठी सुरवातीला आपण राहत असलेल्या सोसायटी मधूनही सुरुवात करता येऊ शकेल. सध्या मार्केटमध्ये असे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जिथे मुलांना फ्रीलांसर म्हणून शिकवण्याच्या तासांनुसार पैसे मिळतात.

व्हिडिओ व्‍यूजद्वारे कमाई

सध्याच्या काळात अनेक लोकं YouTube चॅनलद्वारे भरपूर कमाई करत आहेत. जर आपण कॅमेरा फ्रेंडली असाल तर आपण कोणत्याही विषयाशी संबंधित व्हिडिओ बनवून YouTube वर आपले स्वतःचे चॅनेल तयार करून तो अपलोड करू शकाल. पुढे या व्हिडिओच्या व्ह्यूजमध्ये वाढ होऊन आपली कमाई देखील वाढू लागेल.

ब्लॉगिंगद्वारे कमाई

जर आपल्याला लिहिण्याची आवड असेल तर ब्लॉगिंगद्वारेही आपल्या कमाई करता येऊ शकेल. त्याचबरोबर जर आपल्याला मोठ्या स्तरावर ब्लॉगिंग करायचे असेल तर आपली स्वतःची वेबसाइट देखील बनवू शकता. तसेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून त्याची जाहिरात करून आपल्याला नोकरीबरोबरच पार्ट टाईम उत्पन्न मिळू शकेल. यानंतर आपल्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे जाहिरातीद्वारे कमाई करता येऊ शकेल.