बिझनेसनामा । प्रत्येकाला वाटत असते कि, छोटासा का असेना पण स्वतःचा एक व्यवसाय असावा. मात्र अनेकदा पैशांच्या अडचणीमुळे म्हणा किंवा व्यवसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा लोकं मागे राहतात. जर आपल्यालाही कोणता व्यवसाय करावा असा प्रश्न पडला असेल तर आपण टिश्यू पेपर बनवण्याच्या व्यवसायाचा जरूर विचार करावा. कारण सध्या जगभरात टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा वापर खूपच वाढला आहे. ज्यामुळे त्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्याच्या काळात फक्त ब्रँडेडच नाही तर लोकल टिश्यू पेपर्सना देखील चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे या व्यवसायाद्वारे आपल्याला तर दर महिन्याला भरपूर पैसे मिळवता येतील.
हे लक्षात घ्या कि, कोरोना काळानंतर टिश्यू पेपरच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते आहे. हॉटेल्स, हॉस्पिटल्स, शाळा-कॉलेज इ ठिकाणी तर त्यांचा जास्त वापर केला जातो आहे. या कारणास्तव, टिश्यू पेपरचा प्लॅन्ट सुरु करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. त्याच बरोबर याचा पुरवठा करूनही आपल्याला अगदी सहजपणे लाखो रुपये देखील कमवता येतील. चला तर मग आज टिश्यू पेपरच्या व्यवसायातील खास बाबी समजून घेऊयात.
मशीनची गरज लागेल
टिश्यू पेपर बनवण्यासाठी सर्वांत आधी आपल्याला एक मशीन घ्यावी लागेल. ज्यासाठी 4-5 लाख रुपये खर्च करावे लागतील. यामधील सेमी-ऑटोमॅटिक मशिन हे 5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या कि, या मशीनद्वारे आपल्याला दर तासाला 4-5 इंच आकाराच्या टिश्यू पेपरचे 100 ते 500 पीस तयार करता येतील. मात्र जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी जास्त क्षमतेचे ऑटोमॅटिक मशीन घ्यावे लागेल ज्याची किंमत10-11 लाख रुपयांच्या आसपास आहे. याद्वारे आपल्याला दर तासाला पेपर 2,500 रोल्स बनवता येतील.
किती कमाई होईल ???
एका छोट्या प्लॅन्ट द्वारे 1 वर्षात अगदी सहजपणे 1.5 लाख किलो टिश्यू पेपर तयार करता येईल. तो बाजारात 60-65 रुपये किलो दराने विकता येईल. यानंतर मशिनची किंमत, कच्चा माल, कर्जाचे हप्ते, मजुरी इत्यादी खर्च वजा करून पहिल्या वर्षीच आपल्याला जवळपास 10-12 लाख रुपये सहजपणे मिळू शकतील.
मुद्रा योजनेद्वारे मिळवा लोन
जर आपल्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर त्यासाठी सरकारी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेता येऊ शकेल. हे जाणून घ्या कि, मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर आपल्याला 3.10 लाख रुपयांचे टर्म लोन आणि 5.30 लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल लोन मिळेल.