बिझनेसनामा । आजकाल आधुनिक शेतीकडे लोकांचा कल वाढतो आहे. याद्वारे योग्य तंत्रज्ञान वापरून चांगला नफा देखील कमावता येतो. जर आपल्यालाही शेतीची आवड असेल आणि शेतीशी संबंधित एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला फुलांची शेती करता येईल. कारण यासाठी शेतीच्या कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नसून यासाठी आपलीकडे असलेली शेतीची बेसिक माहिती देखील पुरेशी ठरेल.
हे लक्षात घ्या कि, फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते. कारण प्रत्येक प्रसंगी त्याचा वापर होतो. याशिवाय प्रत्येक फुलाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये काही आहेत. काही फुले ही अत्तरासाठी तर काही औषधासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग आज आपण फुलांच्या शेतीविषयीची सर्व माहिती जाणून घेउयात…
अशा प्रकारे सुरु करा फुलांची शेती
फुलांची शेती करण्याआधी यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही हे सर्वांत आधी पाहावे लागेल. कारण अशी अनेक फुले आहेत ज्यांना भरपूर पाणी लागते. यासोबतच आपल्या प्रदेशातील हवामानानुसारच फुलांची लागवड करावी, जेणेकरून होणारे नुकसान टाळता येईल. यासोबतच शक्य असेल तर आपल्या शेतीच्या प्रदेशानुसार कोणती फुले लावावीत याबाबत तज्ञांकडूनही सल्ला घेता येऊ शकेल. तसेच यासाठी सिंचनाची चांगली व्यवस्था देखील असावी. जर आपल्याला हवे असेल तर आपण पॉलीहाऊसमध्येही फुलांची शेती करू शकता.
भारतात घेतल्या जाणाऱ्या फुलांच्या पिकांची माहिती
हे लक्षात घ्या कि, अशी काही फुले आहेत ज्यांना बाजारामध्ये बारमाही भरपूर मागणी असते. यामध्ये गुलाब झेंडू, जरबेरा, कंद, चमेली, ट्यूबरोज, ग्लॅडिओलस, क्रायसॅन्थेमम आणि एस्टर बेली इत्यादींचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल फुलांचा व्यवसाय
आता आपल्या शेतीतून मिळालेली फुले आपल्याला बाजारात नेऊन विकावी लागतील. यासाठी जवळच्या बाजारातील फुलांच्या दुकानात किंवा परफ्यूम, अगरबत्ती बनवणाऱ्या कंपन्यांना ते विकता येतील. असे केल्याने फुलांना चांगली किंमतही मिळेल. याशिवाय, जर आपण स्वत: बाजारात नेऊन फुलांची विक्री केली तर आणखी जास्त नफा मिळू शकेल.
खर्च आणि नफ्याचे गणित समजून घ्या
हे जाणून घ्या कि, प्रत्येक फुलासाठी बाजारात वेगवेगळा भाव असतो. तसेच काही विशेष सणांच्या पार्श्वभूमीवर तर आणखी भाव मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे यातून किती नफा होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. 1 हेक्टर जमिनीमध्ये फुलांची शेती करण्यासाठी जवळपास 25 हजार रुपये खर्च होतील. तसेच जर आपण भाड्याने शेत घेऊन शेती करणार असाल तर आपल्या खर्चात वाढ होईल. त्याच वेळी, 1 हेक्टरमध्ये एक वेळच्या लागवडीतून जवळपास 75,000 रुपये मिळू आहॆत.