Economic Survey: बजेट म्हटलं की आपण केवळ आकडयांपुरते मर्यादित राहणार नाही आहोत. बजेट किंवा अर्थसंकल्प म्हटलं की त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आणि या प्रत्येक घटकाची अचूक माहिती आपल्याजवळ असलीच पाहिजे, कारण केवळ तेव्हाच तुम्ही बजेट या शब्दचा खरा अर्थ समजून घेऊन शकणार आहात. बजेटच्या बाबतीत सर्वात चर्चेत असलेला शब्द ठरतो तो म्हणजेच Economic Survey, पण याच अर्थ काय किंबहुना गरज काय? चला मग आज जाणून घेऊया..
Economic Survey म्हणजे काय?
खरं तर दरवर्षी देशात 1 फेब्रुवारी रोजी बजेट प्रस्तुत केलं जातं, आणि ते संपूर्ण वर्षेसाठी वैध असतं. आपल्या देशातील आत्ताचा काळ थोडासा वेगळा आहे, सध्या सगळीकडे मतदानाची धमभूमी सुरु आहे, कदाचित मे महिन्यापर्यंत निवडणूक होतील सुद्धा. सादर केलेल्या बजेटमुळे येणाऱ्या सरकारवर कोणताही बोझ पडू नये, किंवा बजेटमधून कार्यरत सरकारने कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवून जनतेला फितवू नये म्हणून अंतरिम अर्थसंकल्प तयार केला जातो.
वार्षिक आराखड्याप्रमाणे बजेटपूर्वी येतो तो म्हणजे Economic Survey, याला आपण मराठीमध्ये आर्थिक सर्वेक्षण म्हणू शकतो. तर या आर्थिक सर्वेक्षणातून अर्थव्यवस्थेबद्दल इतंभूत माहिती सादर केली जाते. गेल्या आर्थिक वर्षांच्या आधारेच आर्थिक सर्वेक्षणाचा आराखडा तयार केला जातो. देशात नेमक्या कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, किती पैसे नेमके कोणत्या मंत्रालयाकडून खर्च केले जात आहेत या सर्वाचा लेखाजोखा असतो तो म्हणजेच Economic Survey किंवा आर्थिक सर्वेक्षण.
आर्थिक सर्वेक्षणाचे दोन विभाग:
आपण आर्थिक सर्वेक्षणाला अर्थसंकल्पाचा आधार मानतो, पण या सर्वेक्षणातून समोर आलेल्या मुद्दयांवरूनच अर्थसंकल्प तयार होईल याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. नक्कीच हे सर्वेक्षण अर्थमंत्रालयाला एकूण बाजाराची, देशाच्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थती आहे याचा अंदाज मिळवायला मदत करते. Chief Economic Advisor च्या देखरेखीखाली हा दस्तऐवज तयार होतो, ज्याचे प्रामुख्याने दोन विभाग असतात. पहिल्या विभागात देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली जाते तर दुसऱ्या विभागात वेगवेगळ्या विभागांतील प्रमुख आकडे मांडले जातात. मात्र लक्ष्यात असुद्या की उद्या सादर होणारं बजेट हे अंतरिम बजेट असल्याने यावेळी कोणतेही आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलेले नाही.