Edible Oil Price : परवडणाऱ्या तेलाचे दिवस पुन्हा येणार; घरच्या बजेटला सुटका मिळणार! 

Edible Oil Price : आपण नेहमीच केंद्र तसेच राज्य सरकारकडून काही मोठमोठ्या घोषणा होण्याची वाट पाहत असतो. सरकारच्या निर्णयामुळे आपल्याला अधिकाधिक फायदा व्हावा व आपलं हित जपलं जावं म्हणून अशा प्रकारच्या अपेक्षा केल्या जातात. गेल्या एका वर्षभरापासून जगभरातील जनता ही महागाईच्या वाढत्या जोराने त्रस्त आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने मदतीचा हात पुढे करत महागाईच्या वाढत्या वेगाला रोख लावावा अशी आपणास सर्वांची इच्छा असणं साहजिक आहे. आत्ताच्या घडीला डाळींपासून ते मसाल्यांपर्यंत अनेक खाद्य पदार्थ महागलेले आहेत आणि आपल्या भारतातील अधिकांश जनता ही सामान्य वर्गातील असल्यामुळे या वाढत्या महागाईचा आपल्यावर गंभीर परिणाम होत असतो, मात्र आज माध्यमांना एक महत्त्वाची बातमी मिळालेली आहे ज्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील दिलासा मिळू शकतो. ती बातमी नेमकी काय हे आज जाणून घेऊया…

सरकारने दिलाय काहीसा दिलासा : (Edible Oil Price)

आज समोर आलेल्या बातमीनुसार खाद्यतेलाच्या आघाडीवर ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून दिलासा दिला गेला आहे. अनेक दिवसांपासून विविध अन्नधान्यांच्या किमती वाढल्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जणालाच महागाईचा त्रास सहन करावा लागत होता, मात्र याच बिघडलेल्या घडीला पुन्हा एकदा नीट करण्यासाठी सरकार आता पावलं उचलताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाला (solvent association of India) जागतिक स्तरावरील किमतीच्या आधारे खाद्यतेलाच्या भावात कपात करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र या क्षेत्राशी निगडित तज्ञांच्या मते ग्राहकांची मागणी ही किमती घटवण्याची असली तरी सुद्धा खाद्यतेलाच्या किमती या एकदम कमी केल्या जाऊ शकत नाहीत पण नक्कीच ग्राहकांच्या हिताचा विचार करत टप्प्याटप्प्यात बदल केले जातील. परिणामी आता साधारण मार्च महिन्यापर्यंत खाद्य तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. लक्ष्यात असुद्या की देशात लवकरच मोहरीचे उत्पादन होणार आहे, आणि त्यानंतर नवीन तेलाचा बाजारात पुरवठा केला जाईल तोपर्यंत काही तेलाच्या किमतींमध्ये घट होणार नाही मात्र येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच आनंदाची बातमी मिळू शकते (Edible Oil Price).

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार जागतिक बाजारात किमती कमी करण्यासाठी सरकारकडून पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यात सोयाबीन, सूर्यफूल, पाम ऑइल यांसारख्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महागाई जरी वाढत असली तरीही नेहमीच ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात. किमान वर्षभरापेक्षा अधिक काळापासून खाद्यतेलाच्या किमती मर्यादेपेक्षा वाढू नयेत म्हणून सरकारच्या प्रयत्न सुरू आहेत. सरकारने मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात आणि आयात शुल्क कमी करण्याचे निर्णय अंमलात आणले आहेत.