Education Loan : शैक्षणिक कर्ज हवंय? या गोष्टी लक्षात ठेवा आणि मगच तयार व्हा

Education Loan । माणसाच्या काही अधिकारांपैकी एक म्हणजे शिक्षणाचा अधिकार. मग शिक्षण घेणारा कुणीही असू शकतो मुलगा किंवा मुलगी, लहान किंवा मोठा माणूस , एखादा श्रीमंत किंवा गरीब. शिक्षण घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला समान आहे. आपल्या देशात शिक्षित वर्गाची संख्या म्हणावी तशी सुधारलेली नाही. देशातील काही गावांमध्ये गरीबी किंवा जुनाट विचारांमुळे मुलांना खास करून मुलींना शिक्षण घेता येत नाही. आपल्या सरकारकडून मात्र वेळोवेळी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातात आणि अनेक योजना देखील राबल्या जातात. फक्त सरकारच नाही तर गरजू मुलांसाठी अनेक बँका देखील विशेष योजना घेऊन येतात.

भारतात मिळतय Education Loan:

भारतात शिक्षण घेण्यासाठी आजही भरपूर पैसा खर्च करावा लागतो आणि अश्यावेळी मदत होते ती कर्जाची. देशाच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक हुशार मुलं आहेत जे केवळ हातात पैसे नसल्यामुळे शिक्षणाला मुकतात. मुलांना पैश्यांची मदत करण्यासाठी सरकार तसेच अनेक बँका कर्ज देतात. ही सुविधा उपलब्ध असली तरी देखील अनेक पालकांना नेमकं कोणत्या बँक मधून कर्ज घ्यावं, अर्ज कसा करावा असे अनेक प्रश्न पडतात. आज आम्ही तुम्हाला याच संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.

शिक्षणासाठी कर्ज घेताना हे लक्षात ठेवा:

१) योग्य तपासणी करा:

कोणतेही कर्ज घेण्याआधी त्या कर्जाबद्दल आणि कर्ज देणाऱ्या बद्दल सगळी माहिती गोळा करा. एकूण प्रोसेस (Process) कशी असेल? किती रक्कम फी म्हणून द्यावी लागेल? अश्या विविध शुल्कांची माहिती तपासून घ्या. इतरांसोबत हा डेटा तपासून पहा आणि मगच निर्णय घ्या.

२) पात्रता तपासा:

कर्ज देण्याआधी बँका आणि बाकी फायनान्स कंपन्या काही पात्रता ठरवत असतात, ते निष्कर्ष समजून घ्या. यात कर्जदाराचं वय, शैक्षणिक पात्रता, कर्जा अंतर्गत येणारे Courses आणि महाविद्यालये यांची यादी असते, तुम्ही त्यात बसता कि नाही हे तपासा

३) कर्जाची रक्कम :

कर्ज घेताना सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे कर्जाची रक्कम. ती तुम्हाला पुरेशी आहे का हे जाणून घ्या. तुमच्या कोर्ससाठी किती पैश्यांची गरज आहे याच्याशी कर्जाच्या पैश्यांची तुलना करून पहा. संपूर्ण वर्षात येणारा खर्च ज्यात होस्टेल फी (Hostel Fees), गरजेची पुस्तकं, महाविद्यालयाची फी इत्यादींचा समावेश होतो. यांची बेरीज करुन खर्चाचा अंदाज लावा.

४) व्याजदर आणि अटी:

कुठलही कर्ज घेताना व्याजदर तपासून पहा. फिक्स्ड(Fixed) आणि फ्लोटिंग(Floating) इंटरस्ट रेट यांची तुलना करा. पैसे परत करण्याबाबत त्यांच्या काय अटी आहेत, ग्रोस पिरीयेड (Gross Period) विषयी माहिती घेऊन मगच कर्जाचा निर्णय घ्या.

५) क्रेडीट स्कोर:

आधी घेतलेल्या कर्जाची जर का तुम्ही वेळेत परतफेड इलेली असेल तर तुमचा क्रेडीट स्कोर(Credit Score) चांगला राहतो. आणि चांगला क्रेडीट स्कोर असलेल्या व्यक्तीला कर्ज देताना प्राधान्य दिलं जातं.

६) प्रोसेसिंगची वेळ तपासा:

कर्ज घेण्यापूर्वी प्रोसेसिंगसाठी (Processing) किती वेळ जाणार आहे ते तपासून पहा, त्यामुळे अर्ज कधी करावा हे ठरवता येतं आणि महत्वाच्या कागदपत्रांची जमवाजमव करायला पुरेसा वेळ मिळतो (Education Loan).

७) अंतिम करार तपासा:

कुठेही सह्या करण्याआधी नियम व अटी परत एकदा तपासून पाहणं सर्वात जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे कर्ज अप्रूव्ह (Approve) झाल्यानंतर सह्या करण्याआधी नियम व अटी पुन्हा एकदा नीट तपासून आणि समजून घ्या.