Effective Working Tips : घरून काम करता, पण लक्ष केंद्रित होत नाही? पाळा हे नियम

Effective Working Tips : कोरोना महामारी सुरु असताना आणि त्यानंतर एक नवीन संकल्पना जगभरात रूढ झाली. ती म्हणजे घरात बसून काम करणे (Work From Home). या सुविधेचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांना झाला. आणि कोरोनाची महामारी संपल्यानंतर सुद्धा अनेक कंपन्यांनी हि सुविधा सुरूच ठेवली आहे. आता काही कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन काम करतात, काही घरून काम करतात तर असेही काही कर्मचारी आहेत जे आठवड्यातील काही दिवस ऑफिसमध्ये जातात आणि उरलेले दिवस घरून काम करतात. यामुळे काय झालाय तर अनेकांचा वर्क बेलंस (Work Balance) डळमळला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरात बसूनही अगदी योग्यरीत्या काम करू शकता.

१) कामाची आखणी तयार करा:

कुठलंही काम करताना त्याची व्यवस्थित आखणी करण महत्वाचं आहे. इथे काय कराल तर कामाचं एक सुंदर वेळापत्रक तयार करा, त्यामुळे तुमच्याजवळ किती वेळ आहे आणि त्यात किती कामं करायची आहेत याचा अंदाज येईल. तुमच्या सर्वाधिक महत्वाच्या कामांची एक लिस्ट बनवा, ती कामं किंवा सोपी कामं आधी पूर्ण करा यामुळे काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळेल आणि अजून काम करण्याची इच्छा तयार होईल.

२) काम करताना ब्रेक घ्या: Effective Working Tips

काम करताना आपण सातत्याने एकाच जाग्यावर बसून असतो आणि आजूबाजूच्या जगाचं भान राहत नाही. पण हि सर्वात चुकीची गोष्ट आहे. कामामध्ये काही मिनिटांचा ब्रेक हा अगदीच महत्वाचा आहे. यामुळे कामावरचा ताण कमी व्हायला मदत होते आणि विश्रांतीमुळे मेंदूला अधिक जास्त चालना मिळते तसेच फ्रेश राहायला मदत होते.

३) वेळेआधी काम सुरु करा:

घरून काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये जात असाल तरीही वेळेच्या आधी कामावर रुजू व्हा. वेळेआधी काम सुरु केल्याने उशीर होण्याधी काम संपायला मदत होते. शिवाय आधी बाकी राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो. Effective Working Tips

४) सहकार्यांशी चर्चा करा:

काम करताना जर का ताण येत असेल तर आजूबाजूच्या मंडळींशी चर्चा करा. तुमच्या समस्या त्यांना विचार, ते अश्यावेळी काय करतात हे जाणून घ्या.किंवा आपल्या बॉस सोबत चर्चा केली जाऊ शकते. त्यामुळे तुमचा ताण कमी व्हायला मदत होईल