Electoral Bonds: Electoral Bonds हा आताच्या घडीला सर्वात अधिक चर्चा केला जाणारा विषय आहे. SBI ने काल महत्वाची सर्व माहिती सादर केल्यानंतर आता बऱ्यापैकी आपल्याला कोणत्या पक्षाजवळ किती पैसे आहेत याचा अंदाज घेणं शक्य झालंय. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार काल SBIने अल्फा न्यूमरिक कोडची माहिती सर्वांसमोर आणली.
कोणत्या पक्षाने कमावलेत सर्वाधिक पैसे? (Electoral Bonds)
समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत भारतीय जनता पक्षाला इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त निधी मिळाला आहे आणि 6000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम भाजपच्या तिजोरीत जमा झाली आहे. हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंग (MEIL) नावाच्या कंपनीने भाजपसाठी सर्वाधिक इलेक्टोरल बाँड खरेदी केले आहेत. MEIL ने 519 कोटी रुपयांचे बाँड खरेदी करून भाजपला निधी दिला आहे.
याशिवाय क्विक सप्लाय या कंपनीने 375 कोटी रुपये, वेदांताने ( 226.7)कोटी रुपये आणि भारती एअरटेलने भाजपला (183 कोटी रुपये) दिले आहेत. मदनलाल लिमिटेड कडून(175.5 कोटी), केव्हेंटर्स फूडपार्क इन्फ्रा (144.5 कोटी) आणि डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्सनी (130 कोटी) यांसारख्या इतर मोठ्या कंपन्यांनीही भाजपला मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे आणि सर्वात शेवटी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी वैयक्तिकरित्या (35 कोटी रुपये) भाजपला दिले आहेत. याव्यतिरिक्त, अनेक व्यक्ती आणि संस्थांनी 10 ते 25 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
भाजपनंतर कोणचा नंबर लागतो?
तृणमूल काँग्रेस (TMC) हा दुसरा सर्वात मोठा लाभार्थी पक्ष ठरला आहे. फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस या दोन कंपन्यांकडून TMC ला 542 कोटी रुपयांची मोठी देणगी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, हल्दिया एनर्जी (281 कोटी रुपये), धारिवाल इन्फ्रा (90 कोटी रुपये) आणि MKJ एंटरप्रायझेस (45.9 कोटी रुपये) या कंपन्यांनीही TMC ला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.
नुकतेच जाहीर झालेल्या निवडणूक निधीच्या आकडेवारीनुसार(Electoral Bonds), वेदांत या कंपनीने काँग्रेस पक्षाला सर्वाधिक 125 कोटी रुपये दान केले आहेत. त्यानंतर वेस्टर्न यूपी ट्रान्समिशन कंपनी (110 कोटी), एमकेजे एंटरप्रायझेस (91.6 कोटी), यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (64 कोटी) आणि अविस ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड (53 कोटी) यांचा क्रमांक लागतो. याव्यतिरिक्त, फ्युचर गेमिंग या कंपनीनेही काँग्रेसला 50 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.