Electoral Bonds Case: SBI कडून Electoral Bonds ची माहिती जाहीर; आता होईल का पर्दाफाश?

Electoral Bonds Case: सध्या देशात सर्वाधिक चर्चा केला जाणार विषय आहे तो म्हणजे निवडणूका, निवडणुकांच्या संधर्भात घेतला जाणारा प्रत्येक विषय हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय आणि अश्यातच एक महत्वाचा मुद्दा उभा राहिला तो म्हणजे Electoral Bonds. काल समोर आलेल्या माहितीनुसार सर्वोच्य न्यायालयाने Electoral Bonds बद्दलची सर्व माहिती जमा करण्याची आज्ञा SBI म्हणजेच State Bank Of India ला दिली होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेनेदेखील आता सर्व माहिती पुरवली आहे.

SBI ने सादर केला डेटा: (Electoral Bonds)

माध्यमांना मिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाला राज्य बँकेने (SBI) Electoral Bondsची संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे प्रत्येक बँडची अक्षर आणि आकडे असलेली ‘Unique Alpha numerical’ माहितीही समाविष्ट आहे. यामुळे कोणत्या बँडची खरेदी कोणी केली आणि ती कोणत्या राजकीय पक्षाला मिळाली हे आता समजणे शक्य होईल. याअगोदर देखील SBI Electoral Bonds बद्दलची माहिती सादर करण्यात आली होती, मात्र ही माहिती अपूर्ण असल्याचा दावा करत सर्वोच्य न्यायालयाने SBI ला लवकरात लवकर राहिलेली माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.

यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीजवळ(BJP) सर्वाधिक Electoral Bonds असल्याची माहिती देण्यात आली होती, तसेच दक्षिण भारतातील कोईंबत्तूर या भागातील एका Future Gaming and Hotel Services नावाच्या गेमिंग कंपनीने सर्वाधिक Electoral Bonds विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. Electoral Bonds यांना आपण एकाप्रकारे डोनेशन म्हणू शकतो, यापूर्वी देशात असलेल्या कायद्यानुसार देशातील कुठल्याही नागरिकाला किंवा उद्योगपतीला हे Electoral Bonds विकत घेण्याची परवानगी दिली गेली होती, आणि याबद्दलची माहिती गुप्त ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती.