आता घरबसल्या भरा तुमचं Light Bill; मोबाईलवरून फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

बिसनेसनामा ऑनलाईन । आजकाल प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले जाते. UPI, Phonepe, Google Pay यासारख्या ॲप वरून आपण सर्व पेमेंट प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. बाहेर साधा चहा जरी पिला तरी ऑनलाईन स्कॅन मारून किंवा मोबाईल नंबर वर ऑनलाईन पेमेंट आपण करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का यासोबतच इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा आपण भरू शकतो. ऑनलाइन पद्धतीने इलेक्ट्रिसिटी बिल भरणे सहज आणि सोपे आहे. यातून आपल्या वेळेची सुद्धा बचत होते आणि वेळेच्या पूर्वी एका क्लीक वर बिल देखील भरले जाते. त्यासाठी फक्त कस्टमर आयडी नंबर गरजेचा असतो.

वीज ही आपल्या जीवनातील अत्यावश्यक गोष्ट आहे. वीज शिवाय आपण कोणतेच काम पूर्ण करू शकत नाही. त्याचबरोबर विजेचे बिल वेळेत भरणे हे देखील आवश्यक आहे. यापूर्वी विज बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहून आपला नंबर येईपर्यंत थांबावे लागत होते. त्याचबरोबर ऑफिसला जाताना किंवा एखादा कार्यक्रम अर्धच सोडून देखील कधी कधी वीज बिल भरण्यासाठी वीज बिल केंद्रावर जावे लागत होते. आता डिजिटल पद्धतीने सर्व गोष्टी हाताळल्या जातात. यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या किंवा ऑफिसमध्ये असताना सुद्धा एका क्लिकवर पेमेंट करू शकतात. या ऑनलाइन पद्धतीने इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यामध्ये कोणतेही नुकसान होत नाही किंवा कोणताही गैरप्रकार घडत नाही.

या पद्धतीने घरबसल्या भरू शकता वीजबिल-

१) ऑनलाइन विज बिल भरण्यासाठी सर्वात अगोदर फोन पे, पेटीएम गुगल पे यापैकी कोणतेही डिजिटल पेमेंट ॲप ओपन करा.
२) त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बोर्ड या ऑप्शन वर क्लिक करा.
३) तुम्हाला सर्व राज्यांची लिस्ट दिसेल. त्यानुसार आपले राज्य निवडा.
४) त्यानंतर तुमचा कंज्यूमर नंबर टाका.
५) त्यानंतर प्रोसीड या ऑप्शन वर क्लिक करा.
६) यानंतर तुम्हाला आलेले इलेक्ट्रिसिटी बिलची किंमत टाकून पेमेंट करा.