Elon Musk आणि भारत सरकार यांच्यात करार होणार? इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल पुढची स्टेप काय?

बिझनेसनामा ऑनलाईन : जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलोन मस्क (Elon Musk) यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच एक कठोर शब्दात कान उघडणी केली होती. गडकरी यांनी एलोन मास्क यांना देशाबाहेरून गाड्या बनवून देशात विकण्यास बंदी घातली होती, असा विचार जर का मस्क करत असतील ते ताबडतोब त्यांनी तो थांबवावा अशी चेतावणीच देण्यात आली होती पण आता यावर एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आणि एलोन मस्क एकमेकांशी हात मिळवणी करणार आहेत का? जाणून घेऊया…

Elon Musk आणि केंद्र सरकार एकत्र :

देशात सध्या एलोन मस्क यांची कंपनी टेस्ला हिला व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत. आता कदाचित भारत सरकार आणि एलोन मस्क एकत्र येऊन काम सुरु करणार आहेत, वर्ष 2024 पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन खऱ्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांची एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत नक्की इलेक्ट्रिक गाड्या तयार होण्याबाबत चर्चा केली गेली, दरम्यान एलोन मस्क आणि त्यांच्या टेस्ला कंपनी बद्दल सुद्धा चर्चा केली गेली आहे. एक महत्वाची बातमी समोर आली आहे, या संपूर्ण चर्चेदरम्यान आता टेस्ला कंपनीला देशात प्रवेश मिळावा म्हणून जोर देण्यात आला होता.

मोदी यांनी घेतली होती मस्क यांची भेट :

या चर्चेच्या आधी म्हणजेच जून महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांची भेट घेतली होती, आणि या दरम्यान दोघांमध्ये हेवी इंडस्ट्री, कॉमर्स इंडस्ट्री, इलेक्ट्रोनिक्स , आयती इंडस्ट्री इत्यादींबद्दल चर्चा करण्यात आली होती. टेस्ला कंपनीला भारतासोबत व्यवसाय करण्याचा करार करण्याची इच्छा आहे, त्यांनी क इलेक्ट्रिक गाड्यांवर 40 टक्क्यांची एक्स्पोर्ट ड्युटी लावण्याचा विचार केला आहे. आता भारत सरकार यावर काय निर्णय घेतो हे सर्वात महत्वाचं ठरणार आहे.