Elon Musk भारतात सुरु करणार कंपनी? पंतप्रधान मोदींची घेतली भेट

बिझनेसनामा ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली. या भेटीत मोदी आणि मस्क यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्यानंतर आपली इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात एंट्री करेल असं मोठं विधान एलोन मस्क यांनी केलं आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

एलन मस्क (Elon Musk) म्हणाले की, मी मोदींचा चाहता आहे. टेस्ला ही इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी लवकरच भारतात आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढच्या वर्षी भारतामध्ये येण्याचा विचार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. खरं तर 2022 मध्ये टेस्लाने भारतात आपला प्लांट उभारण्याची योजना आखली होती परंतु उच्च आयात कर संरचनेमुळे टेस्लाने ते पुढं ढकललं होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा टेस्लाने भारतीय अधिकार्‍यांशी मॅन्युफॅक्चरिंग बेसबद्दल चर्चेला सुरुवात केली होती.

भारता सोबतच टेस्लाला देखील होणार फायदा– (Elon Musk)

टेस्ला ही कंपनी भारतामध्ये आल्यावर फक्त भारताचाच नाही तर टेस्ला या कंपनीचा देखील भरपूर फायदा होऊ शकतो. कारण टेस्ला ला एक नवीन बाजारपेठ भारतात मिळेल. लवकरच भारतामध्ये एप्पल कंपनी सुरू होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी सरकारने बरेच काम केलेले आहेत. त्यातच आता टेस्ला ही कंपनी सुद्धा भारतात आली तर सोन्याहून पिवळ होईल. टेस्ला आणि अँपल या दोन्ही कंपन्या भारतात आल्यानंतर देशात सकारात्मक वातावरणही निर्माण होईल. आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला आणखी चालना मिळेल. याशिवाय अनेक भारतीयांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतील.