Elon Musk : गेल्या काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांच्या विरोधात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. एका मुलाखतीत बोलताना या विरोधांबाबत त्यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं आहे. ही मुलाखत New York Times deal book summit च्या दरम्यान घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एलोन मस्क यांनी ज्यू आणि गोऱ्यालोकांच्या बाबत चालेल्या एका ट्वीटचे समर्थन केले होते, यामुळे अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या व कित्येक जाहिरातदारांनी X ला रामराम ठोकला, एका ट्वीटमुळे एलोन मस्क मोठ्या संकटाच्या कचाट्यात सापडले होते. मात्र पहिल्यांदाच त्यांनी याबद्दल चर्चा केली आहे. त्यामुळे X वर शेअर केलेल्या ट्विट बद्दल काय म्हणाले एलोन मस्क जाणून घेऊया…
X वरील पोस्ट बद्दल काय म्हणतात एलोन मस्क:
एलोन मस्क यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या ट्वीट नंतर अनेकांनी त्यांच्यावर ज्यू लोकांना गोऱ्या विरुद्ध भडकवत असल्याचा आरोप केला होता. मात्र या पोस्ट संदर्भात माफी मागत एलोन मस्क यांनी या चर्चांना कायम स्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर शेअर केलं गेलेलं हे ट्विट त्यांच्या गेल्या अनेक असंबंधित ट्विट पैकी एक असू शकतं असंही ते यादरम्यान म्हणाले.
एलोन मस्क हे सेमेटिक आहेत का? (Elon Musk)
शेअर केलेल्या ट्विट बद्दल एलोन मस्क यांनी माफी मागितली असली तरीही सेमेटिक असण्याबाबत केलेल्या आरोपाला त्यांनी फेटाळून लावले आहे. आणि असे आरोप करत X मधून निघून जाणाऱ्या जाहिरातदारांनी कंपनीचे सर्वेसर्वा यांना गृहीत धरू नये असेही ते यावेळी म्हणाले. जाहिराती किंवा पैशांच्या माध्यमातून कुणीही मला ब्लॅकमेल करू शकत नाही असे स्पष्ट विधान त्यांनी सर्वांसमोर केले आहे. या मुलाखतीच्या वेळी डिज्नीचे मालक रॉबर्ट इगर हे देखील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते, रॉबर्ट ईगल यांनी देखील हल्लीच ट्विटर मधून आपला काढता पाय घेतला आहे. म्हणूनच एलोन मस्क यांनी त्यांच्यावर रोख धरून असे विधान केल्याबद्दल चर्चा अनेकांमध्ये सुरू आहेत.
नेमका वाद काय?
इस्रायल- हमास संघर्ष सुरू झाल्यापासून सेमेटिझममध्ये चिंताजनक वाढ झाल्याबद्दल यूएस सिनेटचे बहुसंख्य नेते चक शूमर यांनी दिलेल्या चेतावणीशी मस्कची टिप्पणी जुळली होती आणि व्हाईट हाऊसने मस्कच्या पोस्टचा (Elon Musk) निषेध केला तसेच मस्क यांच्यावर “सेमिटिक आणि वर्णद्वेषाचा भयंकर समर्थन” करीत असल्याचे आरोप लावण्यात आले.
मस्क यांच्या पोस्टनंतर वॉल्ट डिस्ने, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि NBCU युनिव्हर्सल पॅरेंट’ कॉमकास्ट सारख्या प्रमुख यूएस कंपन्यांनी, X वरील त्यांच्या जाहिरातींना विराम दिला. यात एक उदारमतवादी वॉचडॉग GRO ने नाझीवादाचे समर्थन करणार्या पोस्टसह जाहिरातींचा अहवाल देऊन जाहिरातदारांच्या निर्गमनाला चालना दिली होती. आता मस्क यांनी आठवड्याच्या सुरुवातीला या गटावर दावा ठोकण्याचा दावा केला आहे.