Elon Musk देणार PhonePe, GooglePay ला टक्कर; आता ‘X’ वरून करता येणार पेमेंट

Elon Musk : एलोन मस्क हे नेहमीच आपल्या रणनीतीमध्ये वेगवेगळे बदल घडवत असतात. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी एलोन मस्क यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या युक्तांमुळेच त्यांना एक चतुर व्यावसायिक म्हणून ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी ट्विटर या सोशल मीडिया कंपनीची संपूर्ण जबाबदारी मिळवल्यानंतर त्यांनी ट्विटर मध्ये काही विशेष बदल घडवून आणले. एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरच्या मॉनिटायझेशन पोलिसीस तर बदलल्याच पण सोबतच या कंपनीचे नाव ट्विटर वरून एक्स (X) असे करण्यात आले. आज पुन्हा एकदा Xच्या बाबतीत मस्क यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. एलोन मस्क म्हणतात की आता ट्विटर म्हणजेच X ही केवळ मायक्रो ब्लोगिंग साईट राहणार नाही, तर या ॲपचा वापर करून तुम्ही सर्व प्रकारची कामे करू शकणार आहात. एलोन मस्क लवकरच X वर Peer to Peer पेमेंटची प्रक्रिया सुरू करतील. याचाच अर्थ असा की आता X वरून देखील तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार आहेत. सुरुवातीला ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येईल.

आता X वरून करता येणार आर्थिक व्यवहार:

एलोन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर या कंपनीमध्ये अनेकांना बदल घडवून आणले आणि आता X चा वापर करून आपल्याला आर्थिक व्यवहार देखील करता येणार आहेत. ही प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होईल याबद्दल अद्याप त्यांनी कोणती घोषणा केलेली नाही, या प्लॅटफॉर्मवरून नेमकं काम कसं चालेल याबद्दलही माहिती एलोन मस्क (Elon Musk) यांनी दिलेली नाही. लवकरच ट्विटरवरून आर्थिक व्यवहार देखील करण्यात येतील केवळ एवढीच माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. एका रिपोर्टच्या आधारे अशी बातमी समोर आली होती की X ला सध्या चौदा शहरांमध्ये आर्थिक व्यवहार करण्याचे लायसन्स प्राप्त आहे. याचाच अर्थ असा की आत्ताच्या घडीला तरी केवळ अमेरिकेमध्येच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

ट्विटरमध्ये एलोन मस्कनी केले होते अनेक बदल: (Elon Musk)

एलोन मस्क यांनी ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचे जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याचे संपूर्ण स्वरूप बदलून टाकले. या कंपनीचे नाव, लोगो तसेच मॉनिटायझेशन पॉलिसी देखील बदलण्यात आल्या. या पुढे देखील X मध्ये अधिकाधिक बदल घडवून येणार आहेत. लोकांना या प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सेवा पुरवली जात आहे. याशिवाय X चा वापर करून आता लोकं आवडीच्या नोकरीचा शोध देखील घेऊ शकतील. X ही नेहमी वेगवेगळ्या मता मांडणीचा प्लॅटफॉर्म आणि योग्य बातम्या जनसमूहापर्यंत पोहोचवणारे माध्यम म्हणून ओळखले जाणारे कंपनी होती, अनेक बदल घडत असल्यामुळे आता कंपनीचे स्वरूप बदलणार आहे.