Elon Musk Twitter Logo। प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचा लोगो येत्या काही दिवसात बदलण्याची शक्यता आहे. ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी याबाबत एक सूचक ट्विट करत तसे संकेतही दिलेले आहेत. यापूर्वी सुद्धा एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून पेड स्बक्रिप्शनसह अनेक वेगेवेगळे बदल केले आहेत. आता ट्विटरचा लोगो असलेल्या चिमणीच्या जागी X हा लोगो असु शकतो.
इलॉन मस्कने नुकतेच एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये लिहिले लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळू हळू सर्व चिमण्यांना निरोप देऊ. ट्विटर लवकरच ‘ट्विटर’ या ब्रँड नावापासून दूर जाऊ शकते. आणि ब्लूबर्ड ऐवजी नवीन लोगो (Elon Musk Twitter Logo) ट्विटरला मिळू शकेल. मात्र तज्ज्ञांच्या मते, ट्विटर हे आधी सारखंच सुरु राहील फक्त त्याच्या नावात आणि लोगो मध्ये काही बदल होईल.
लोगोमध्ये X हे नाव असण्याची शक्यता- (Elon Musk Twitter Logo)
एलोन मस्क यांच्या बहुतेक कंपन्यांच्या नावात किंवा लोगोमध्ये X हे नाव याआधी पण आपल्याला पाहायला मिळाले आहे. मस्क यांनी त्यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनी SpaceX च्या नावावर सुद्धा X चे नाव ठेवले आहे. त्याचप्रमाणे X ला त्याच्या अलीकडील कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI मध्ये देखील X चा उल्लेख दिसतोय. त्यामुळे आता ट्विटरच्या नावात आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसू शकण्याची शक्यता जास्त आहे.
दरम्यान, एलोन मस्क यांनी ट्विटर $ 44 बिलियन (3 लाख 36 हजार कोटी) मध्ये विकत घेतले. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क यांनी त्यामध्ये अनेक वेगवेगळे बदल केले. मस्क यांनी आपल्या यूजर्स कडून ब्लु टिक साठी पेड सबक्रिप्शन सुरु केलं. त्यामुळे जे पैसे भरणार नाहीत अशा लोकांची ब्लु टिक मस्क यांनी हटवली. त्यामुळे यूजर्स चांगलेच नाराज झाले. त्यानंतर आता ते ट्विटरचा लोगो सुद्धा बदलण्याच्या तयारीत आहेत.