बिझनेसनामा ऑनलाईन । पूर्वी ट्वीटर म्हणून ओळखली जाणाऱ्या कंपनीचे नाव बदलून X असे करण्यात आले आहे, या कंपनीची जबाबदारी Elon Musk सांभाळतात. जगभरात एलोन मस्क यांची एक हुशार आणि विचारी उद्योगपती म्हणून केली जाते, पण म्हणतात न माणूस किती हुशार असला तरीही त्याची एक चूक पूर्ण साम्राज्याला हानिकारक ठरू शकते,तशीच काहीशी बाब आज इथेही घडली आहे. एलोन मस्क यांनी केलेल्या एका पोस्टमुळे पूर्ण कंपनीला 7.5 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. काय झालंय नेमकं प्रकरण जाणून घेऊया..
मस्कमुळे ट्वीटरला नुकसान: (Elon Musk)
खरंतर X म्हणजेच ट्वीटरची ओळख एलोन मस्क यांच्याशी जोडली गेली आहे. मात्र त्यांच्या एका चुकीमुळे आता याच कंपनीला 7.5 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागणार आहे, आणि हा तोटा कंपनीच्या जाहिरात महसुलात दिसून येईल. अलीकडेच एलोन मस्क यांनी एक एन्टी सेमिटिक पोस्टचे समर्थन केले होते, आणि म्हणूनच अनेकांनी त्यांच्या विरोधात सेमीटीझमला सहकार्य केल्याबद्दल विरोध दर्शविला होता. याच्याच परीणामार्थी 200 पेक्षा अधिक कंपन्यांनी X वर आपले मार्केटिंग थांबवाले आहे, ज्यात Airbnb,Amazon, Coca Cola आणि Microsoft यांसारख्या कंपन्यांचा समावेश होतो .
अलीकडेच X वर सेमेटिझम विरुद्ध एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टला प्रतिसाद देताना एका वापरकर्त्याने लिहिले की ज्यू समुदाय गोर्या लोकांविरूद्ध द्वेषाला प्रोत्साहन देत आहे, ज्याचा वापर त्यांच्याविरूद्ध करणे थांबवावे अशी त्यांची इच्छा आहे. इलॉन मस्क यांना ही पोस्ट आवडली आणि म्हणून त्यावर प्रतिक्रिया देत समर्थनात्मक पोस्ट लिहिली, मस्क यांचे ट्विट सेमेटिझम म्हणून पाहिली जात असल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली. असं म्हटलं जातंय कि जेव्हापासून एलोन मस्क (Elon Musk) यांनी X या कंपनीचा ताबा मिळवलाय तेव्हापासून कंपनीच्या जाहिरातींच्या कमाईत घट झाली आहे. कंटेंट मॉडरेशन कमी केल्यामुळे X वर द्वेषपूर्ण पोस्ट्सची संख्या वाढली आहे आणि हेच त्याचे प्रमुख कारण म्हटलं जातंय .
X ने केलाय आरोप:
याच दरम्यान X कडून सोशल मिडिया वॉचडॉग ग्रुप मिडिया मेटर्सवर आरोप करण्यात आला आहे. आरोपात X कंपनी म्हणते कि मिडिया मेटर्स कंपनीला बदनाम करत आहेत. मीडिया मटर्सने एक अहवाल सदर केला होता ज्यामध्ये त्यांनी ऍडॉल्फ हिटलर आणि नाझी पार्टीशी संबंधित पोस्ट्स जवळ ऍपल आणि ओरॅकल यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचे पोस्ट प्रदर्शित केले जात आहेत असा आरोप केला होता.