Emergency Fund म्हणजे काय? तो महत्वाचा कशाला, थोडक्यात जाणून घ्या

Emergency Fund : इमरजन्सी फंड हे नाव तुम्ही वेळोवेळी ऐकलं असेल, किंवा अनेकांनी तुम्हाला इमरजन्सी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असेल. पण इमरजन्सी फंड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर काळजी करू नका कारण आज आम्ही तुम्हाला याबद्दल सगळी माहिती देणार आहोत. आजच्या काळात प्रत्येकाजवळ इमरजन्सी फंड असणं गरजेचं आहे. काही काळापूर्वी कोरोनाच्या महामारीत इमरजन्सी फंड किती महत्वाचे आहेत याचं महत्व सगळ्यांनाच पटलय. तर मग Emergency Fund म्हणजे काय आणि तो महत्वाचा कशाला हे आज थोडक्यात जाणून घेऊया .

Emergency Fund म्हणजे काय आणि तो महत्वाचा कशाला?

आयुष्यात काही प्रसंग असे येतात जेव्हा पैशांची अचानक गरज पडते, कोरोना काळाचंच उदाहरण घ्या. जेव्हा अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किती जणांवर घरी बसण्याची वेळ आली. काही टक्के आर्थिक चणचण सगळ्यांनीच सहन केली. अशा कठीण काळात मदत व्हावी म्हणून इमरजन्सी फंडचा वापर केला जातो. जर का तुमच्याजवळ इमरजन्सी फंड नसतील तर अशा कठीण काळात तुम्हाला साठवलेल्या FD किंवा अन्य गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतील. जर का एखाद्या दिवशी तुम्ही नोकरी गेली किंवा वाईट परिस्थिती ओढवली तर इमरजन्सी फंडचा वापर करता येतो.

इमरजन्सी फंड किती असावा?

तज्ञ म्हणतात कि तुम्ही किती पैसे कमावता आणि तुमचा एकूण खर्च किती आहे यावर इमरजन्सी फंड ठरवला जातो. खास करून हा इमरजन्सी फंड तुमच्या पगारापेक्षा सहा पट अधिक असायला हवा कारण कठीण काळात हेच पैसे तुमच्या कामी येणार आहे. गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या कि ती एकाच ठिकाणी न ठेवता विविध ठिकाणी करावी, कारण अशी छोटी छोटी रक्कम गुंतवून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता. शक्यतो हा इमरजन्सी फंड कुठल्याही गुंतवणुकीचा भाग नसावा.