Engineering Jobs In India : भारतीय इंजिनियर्सना मोठी संधी!! येत्या काळात 3 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होणार

Engineering Jobs In India: देशात सध्या इंजिनियरिंगच्या क्षेत्रातील मागणी वाढत चालली आहे. याच प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारची सुरु करण्यात आलेली धोरणं, यात मेक इन इंडिया (Make In India)चा सर्वात मोठा सहभाग आहे. मेक इन इंडियाचा वाढता प्रभाव आणि भारतीय अर्थव्यवस्थेची वाढती ताकद यांमुळे जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्या( MNC) भारतात नवीन प्लांट उभारण्याच्या तयारीत आहे. भारत हा प्रगतीशील देश असल्यामुळे टेस्ला सारख्या दिग्गज कंपन्या नेहमीच आपल्यासोबत गुंतवणूक करण्यात इच्छुक असतात आणि म्हणूनच आपल्या देशातील इंजिनियरिंग क्षेत्रात यामुळे मोठा बदल घडून येऊ शकतो.

भारतातील इंजिनियर्सना मोठी संधी:

देशभरातील अनेक कंपन्यांनी संशोधन, डिझायन आणि अभियांत्रिकी संबंधित कामांसाठी भारतीयांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. हे बदल येणाऱ्या काही दिवसांमध्ये इंजिनियरिंग क्षेत्राला वृन्धिगत व्हायला मदत करेल अश्या शक्यता वर्तवल्या जात आहेत (Engineering Jobs In India). येत्या तीन चार वर्षांमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या नोकऱ्या विशेष करून एविएशन, ऑटोमोबाइल, टायर, पार्ट्स मेकिंग आणि इलेक्ट्रिकल या क्षेत्रांमध्ये तयार होऊ शकतात आणि हि गोष्ट खरी ठरल्यास इंजिनियरिंग क्षेत्रात 40 टक्क्यांनी वाढ आलेली पाहायला मिळेल. तसेच इंजिनियरिंग महाविद्यालयांमध्ये देखील नवीन विद्यार्थ्यांची भर पडेल.

नवीन नोकऱ्या तयार होणार: (Engineering Jobs In India)

भारतात हरित वाहतुकीचे पर्याय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये सरकार डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, सौरऊर्जेला चालना, इंधनात इथेनॉल आणि बायोगॅस मिसळणे यावर विशेष लक्ष केंद्रित करून काम करत आहे. त्यामुळे पाच वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्राशी संबंधित नोकऱ्या तयार होण्याची शक्यता अधिक आहे.

मल्टी नेशनल कंपन्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये इच्छुक असल्यामुळे आयटी क्षेत्राऐवजी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्ससाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते मर्सिडीज-बेंझ, बॉश, मिशेलिन, एबीबी, बोइंग, एअरबस, रेनॉल्ट, फोक्सवॅगन ग्रुप, श्नाइडर इलेक्ट्रिक, जॉन डीरे, कॅटरपिलर, कॉन्टिनेंटल आणि कॉलिन एरोस्पेस या कंपन्या भारतात काम सुरु करतील.