EPFO Pension Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO कडून त्यांच्या संबंधित कंपन्यांना अधिक पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी मुदत वाढ करवून देण्यात आली आहे. यामुळे आता कंपन्यांना वेतन तपशील अपलोड करण्यासाठी आणखीन पाच महिने मिळणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शनची आवश्यकता आहे ते 31 मे 2024 पर्यंत त्यांचे संबंधित तपशील अपलोड करू शकतात. या बातमीमुळे कंपन्यांना थोडीशी सवलत मिळाली आहे. या बातमीची कामगार मंत्रायलने पुष्टी केलेली असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता EPFO च्या केंद्रीय मंडळाने संबंधित तपशील अपलोड करण्यासाठी कंपन्यांना मुदत वाढ करवून दिली आहे. याआधी जारी केलेल्या निर्णयानुसार उच्च पेन्शनची निवड करणाऱ्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे तपशील समाविष्ट करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 अशी अंतिम तारीख देण्यात आली होती.
EPFO ने दिली आहे ऑनलाईन सुविधा: (EPFO Pension Update)
हल्लीच्या टेक्निकल युगात सर्व व्यवहार ऑनलाईन आणि चुटकीसरशी पूर्ण केले जातात. EPFO ने सुद्धा याच ऑनलाईन सुविधेची मदत घेतलेली असून उच्च पेन्शनची निवड केलेल्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांची संबंधित माहिती पुरवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध देण्यात आली होती. या संधर्भात 4 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वोच्य न्यायालयाने आदेश जाहीर करत सदर पर्याय सवलत म्हणून देऊ केला होता. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2023 पासून या सुविधेची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होते कि, EPFO ला सर्व पात्र कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी द्यावा लागेल. हा अवधी खरं तर 2 मार्च 2023 पर्यंत वैध होता, मात्र नंतर त्यात दोन वेळा वाढ करण्यात आली.
आता EPFO च्या या प्रक्रियेला कर्मचाऱ्यांकडून दमदार प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत EPFO च्या कर्मचाऱ्यांकडे 17.49 लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आणि यानंतर EPFO कडून संबंधित नियोक्त्यांना (employers) त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तपशील समाविष्ठ करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 अशी मुदत देण्यात आली, आणि पुढे हि तारीख बदलून 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतीचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पर्याय किंवा संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी 3.6 लाखांपेक्षा अधिक अर्ज अजूनही प्रलंबित आहे आणि म्हणूनच वेतन तपशील समाविष्ट करण्यासाठी आता EPFO ने 31 मे 2024 पर्यंतची मुदत वाढ (EPFO Pension Update) करवून दिली आहे.