EPFO PPO Number : पेन्शन मिळवण्यासाठी PPO नंबर आहे महत्वाचा; विसरला असाल तर अशा प्रकारे शोधा

EPFO PPO Number : ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा महिना हा पेन्शन घेणाऱ्या लोकांसाठी फार महत्वाचा असतो, कारण या महिन्यांतच त्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. जीवन प्रमाणपत्र सादर करताना महत्वाचा असतो तो PPO नंबर (Pension Payment Order). हा एक बारा नंबरी पिन असतो, जो प्रत्येक पेन्शन धारकाला EPFO (Employees Provident Funds Organization) कडून दिला जातो. हा नंबर फारच महत्वाचा आहे, कारण याच्या मदतीने EPS( Employment Pension Scheme) च्या अंतर्गत चालणाऱ्या गोष्टींची नोंद केली जाते.

EPFO PPO Number महत्वाचा आहे का?

सेवानिवृत्त झालेल्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सदर करावे लागते, कारण यानुसार त्यांची पुढील पेन्शन सुरु राहत असते. मात्र काही दिवसांपूर्वी सरकारने या मुदतीत काही बदल केले असून 80 वर्षांवरील अधिकारी एक महिना अगोदर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. काहीवेळ PPO नंबर (EPFO PPO Number)गडबडीत विसरला जातो, ज्यामुळे त्यांना जीवन प्रमाणपत्र सदर करणे व पेन्शनची स्थिती जाणून घेणं कठीण होऊन जातं. आत्ता मात्र काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला काही Online पद्धती सुचवणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही PPO नंबर अगदी सहज परत मिळवू शकता.

EPFO PPO Number नंबर कसा मिळवाल?

या Online काळात गोष्टी फारच सोप्या झाल्या आहेत. आणि कामं देखील झटपट होऊन जातात. आपला PPO नंबर मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे Online सुविधांची मदत घेणे. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप्स खालीलप्रमाणे सांगणार आहोत त्या फॉलो करा.

१) सगळ्यात आधी www.epfindia.gov.in या अधिकृत साईटला भेट द्या.

२) नंतर PPO Number हा पर्याय निवडा.

३) पुढे PPO नंबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते क्रमांक किंवा PF नंबर द्यावा लागेल.

४) पुढे काही वेळातच तुम्हाला तुमचा PPO नंबर व सदस्य ID टाकावा लागतो.

Digilocker चा वापर करून मिळवा PPO नंबर:

१) सर्वात आधी https://digilocker.gov.in या अधिकृत साईटला भेट द्या.

२) यानंतर UNA सर्विसीस मध्ये जाऊन UAN नंबर टाका.

३) समोर येणारा Documentsचा पर्याय निवडून पेन्शन प्रमाणपत्राचा पर्याय घ्या.

४) त्यानंतर E-PPOची यादी तुमच्या समोर येईल, जिथून आपला PPO नंबर अगदी सहज मिळवला जाऊ शकतो.

देशातील अनेक लोकं पेन्शनचा फायदा घेत आहेत. आणि या डिजिटल युगात तर गोष्टी अजून सोप्या बनल्या आहेत. पेन्शन मिळवण्यासाठी आधार कार्ड नंबर, नाव, फोने नंबर आणि पेन्शन प्रमाणपत्र या गोष्टी महत्वाच्या आहेत. मात्र अनेकवेळा लोकं हाच PPO नंबर विसरतात. मात्र आत्ता वर सुचवलेल्या गोष्टींची मदत घेत तुम्ही PPO नंबर कायमचा लक्ष्यात ठेऊ शकता, व पेन्शनचा लाभ मिळवू शकता.