Eureka Competition : स्टार्ट अपचा विचार करताय? या स्पर्धेत भाग घेऊन जिंका आकर्षक बक्षिसे

Eureka Competition: IIT बॉम्बे कडून यावर्षी पुन्हा एकदा युरेका हि स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्या इच्छुकांसाठी नोंदणी सुरु झाली असून, विजेत्यांना कोट्यावधी बक्षिसे जिंकण्याची आकर्षक संधी उपलब्ध झाली आहे. काय आहे IIT बॉम्बेची हि स्पर्धा, कसं नाव नोंदवावं आणि बाकी सर्व काही जाणून घेण्यासाठी खाली नक्की वाचा..

Eureka Competition 2023:

IIT बॉम्बेच्या ई-सेलने हि स्पर्धा आयोजित केली आहे, आणि हि पूर्णपणे विध्यार्थ्याकडून चालवली जाणारी स्पर्धा आहे. बॉम्बे सेल बदल अजून सांगायचं म्हणजे हि एक नॉन प्रोफीट संस्था आहे. आपला भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील तरुण हीच आपली खरी ताकद आहे असं म्हणतात. या तरुणांमध्ये उद्योजाग्तेची भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील या भावनेला चालना देण्यासाठी या स्पर्धेची सुरुवात कार्यात आली आहे. स्टार्ट अपची कल्पना बाळगणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणे, त्यासाठी लागणारा पैसा उभा करवून देणे, नेटवर्किंग आणि इतर महत्वाच्या गोष्टींमध्ये मदत करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. इन इंडिया, युनेस्को, स्टार्ट अप इंडिया यांसारख्या मोठाल्या संस्थांचे या स्पर्धेला पाठबळ आहे. का स्पर्धेने झोस्टेल, प्रतिलिपी यांसारख्या व्यवसायांना उभं राहण्यासाठी मदत केली आहे.

नेमकी काय आहे स्पर्धा:

आशिया खंडातील बिजनेस मॉडेल मानली जाणारी हि एक दर्जेदार स्पर्धा आहे. युरेका (Eureka Competition) हि बिजनेसच्या संदर्भात घेतली जाणारी स्पर्धा आहे. आणि हे त्याचं सलग 26 वे वर्ष आहे. या स्पर्धेचा आवाका भरपूर मोठा असून यात एकूण 15 हजार किंवा त्याहीपेक्षा जास्ती टीम्स सहभागी होतात. यावर्षीची स्पर्धा अजून भव्य होणार आहे. एक्सिस बँक, अमरा राजा बेट्रीज, वेस्टब्रिज केपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हि स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

हि फक्त एक स्पर्धा नसून तुमच्या मनात सुरु असलेल्या विचारांना मार्ग दाखवणारी एक संधी आहे. या मिळालेल्या संधीचं सोनं करता आला तर याशिवाय मोठा टर्निंग पोइंट तुमच्या आयुष्यात असू शकत नाही. जर का तुमच्या मनात अश्या काही कल्पना असतील तर नक्कीच तुम्ही यात नाव नोंदणी करावी. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी व सहभागी होण्यासाठी ecell.in/eureka या अधिकृत साईटला भेट द्या.