Existing Bank Account Transfer : बहुतेकवेळा नोकरदारवर्ग कामाच्या आवश्यकतेमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थायिक होतात. अश्यावेळी बँकिंगच्या संधर्भात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आणि परिणामी कर्मचारी वर्ग सर्व व्यापला कंटालेला पाहायला मिळतो. पण प्रत्येकवेळी जागा बदलली म्हणून बँकेत नवीन खातं उघडण्याची गरज नसते, त्याआधी इतर अनेक पर्यायांचा अवलंब केला जाऊ शकतो. त्यामुळे लगेचच नवीन खातं उघडण्याचा घाट घालू नका.पण अश्यावेळी काय करता येईल असा प्रश्न जर तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर काळजी करू नका, कारण आम्ही आज त्याच विषयी थोडक्यात माहिती देणार आहोत.
कोणता मार्ग उपलब्ध ?
नोकरी म्हटलं कि अनेकवेळा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बदली आलीच. अश्या प्रसंगी इतर सर्व गोष्टींची हलवाहलव करावी लागतेच पण त्याच सोबत बँकेची कामही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करावी लागतात. कित्येगदा तुम्ही काम करत असलेली कंपनीच तुम्हाला बँकेचं खातं बदलण्यासाठी भाग पाडू शकते. मात्र अश्यावेळी कायम लक्ष्यात ठेवा कि जागा बदलली म्हणून बँक खातं बदलण्याची गरज नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बँक खातं ट्रान्स्फर करण्याचा मार्ग देखील उपलब्ध आहेत (Existing Bank Account Transfer). आणि टेक्नोलॉजी जास्तीत जास्त प्रगत होत असल्यामुळे बँकेत जाऊन वेगवेगळे फॉर्म भरत हि प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज पडत नाही.
जागेनुसार खातं कसं बदलावं? (Existing Bank Account Transfer)
अनेकवेळा ग्राहकांच्या याच गरजेला ओळखून त्यांना अधिक त्रास सहन करावा लागू नये म्हणून बँका त्यांना होम ब्रांचची सेवा उपलब्ध करून देतात. आणि याच्यासाठी कुठल्याही बँकेत जाऊन कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नसते. तुम्ही घर बसल्याच अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या बँकेची मुख्य शाखा बदलू शकत. उदाहरणार्थ आम्ही तुम्हाला सर्वात प्रसिद्ध स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते कसे बदलता येईल याची थोडक्यात प्रक्रिया सांगणार आहोत. मात्र एक गोष्ट कायम लक्ष्यात असुद्या कि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शाखा बदलण्यासाठी तुमच्याजवळ KYC असणे अनिवार्य आहे.
स्टेट बँकच्या सर्व ग्राहकांना खातं ट्रान्स्फर करण्यासाठी सर्वात आधी www.onlinesbi.com या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. बँक सर्व ग्राहकांना इंटरनेटचा वापर करत बँकिंग सेवेचा लाभ घ्यायला मदत करत आहे म्हणूनच बँक कडून दिल्या गेलेल्या यूजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून तुमच्या नेट बँकिंगच्या खात्यात प्रवेश करावा. यानंतर Quick Links या टॅब अंतर्गत Saving Account Transfer हा पर्याय निवड. आता तुम्हाला बदल आवश्यक असलेल्या खात्याची निवड करावी लागेल आणि कुठे बदल करायचा आहे याची माहिती द्यावी लागेल, ज्यासाठी Get Branch Name या पर्यायाची निवड करा(Existing Bank Account Transfer). लक्ष्यात ठेवा कि सर्व प्रक्रियेमध्ये नियम व अटी व्यवस्थित वाचणे अनिवार्य आहे. सर्व माहिती समाविष्ट करून झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक कोड येईल आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची प्रमुख शाखा बदलेल.