Fake SBI Branch: आपल्या आजूबाजूला फसवणुकीचं प्रमाण हे वेगाने वाढतंय, त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती पासून सावध राहण्यासाठी आपण वेळीच उपाय केले पाहिजेत. हे गुन्हेगार नेमक्या कोणत्या पद्धतीनेचा वापर करून आपल्याला गंडा घालतील हे सांगता येत नाही, त्यामुळे समोर आलेली माहिती ही नेहमीच पडताळून, त्यावर योग्य विचार करून निर्णय घेतला पाहिजे. दक्षिण भारतात तमिळनाडूमध्ये तीन लोकांनी मिळून खोट्या एसबीआय (SBI) बँकची सुरुवात केली. एवढंच नाही तर ह्या तिघांनी मिळून तब्बल तीन महिन्यांसाठी या खोट्या बँकला हुबेहूब बँकचे स्वरूप देण्याचा प्रताय्त्न केला. मात्र आता हा सगळा गुन्हा उघडकीस आलेला असून, तिन्ही गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. कदाचित अशा प्रकारचे गुन्हे आपल्या आजूबाजूला देखील घडत असतील, या बातम्या वाचून आपण किती सावधगिरीने वावरलं पाहिजे याचा अंदाज येतो. त्यामुळे केवळ बातमी वाचून शांत बसू नका, तुमच्या बरोबर अशा एखादा गुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या.
तमिळनाडू सुरू होती खोटी एसबीआय: (Fake SBI Branch)
दक्षिण भारतातील तामिळनाडू येथे गेल्या तीन महिन्यांपासून, तीन गुन्हेगार एकत्र येऊन खोटी एसबीआय (SBI) शाखा चालवत होते. ही शाखा खोटी असली तरी देखील तीन महिने म्हणजे 90 दिवस गुन्हेगारांनी तिला बँकचे हुबेहूब स्वरूप दिले, आणि लोकांना लुटायचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आल्यानंतर तिघांना अटक केली आहे. तमिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पनरुती या भागातून तिन्ही गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. आणि या प्रकारातील सर्वात खेददायक बाब म्हणजे, यांच्यामधला एक गुन्हेगार हा स्वतः बँक कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे.
सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार कमल बाबू नावाचा इसम या सर्व प्रकरणाचा सूत्रधार आहे (Fake SBI Branch). कमल बाबूचे आई वडील हे दोघे बँक कर्मचारी असल्यामुळे त्याला बँकेच्या व्यवहारांबद्दल सखोल माहिती होती. त्याच्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून आईने कदाचित दोन वर्षांपूर्वी बँक मधून रिटायरमेंट घेतली आहे. त्याच्या दोन्ही साथीदारांपैकी एक साथीदार हा प्रिंटिंग प्रेस चालवत होता तर तिसरा व्यक्ती रबर स्टॅम्प छापण्याचे काम करीत होता.
अशाप्रकारे चालवत होते खोटी SBI:
खोटी बँक चालवणं हे काही सामान्य माणसाला जमणारं कृत्य नाही, कारण कायद्याने आपल्या देशात नोटा छापण्याचा काम हे केवळ सर्वोच्च बँक म्हणजे आरबीआय (RBI) कडून केलं जातं. या तिन्ही गुन्हेगारांमधला एक व्यक्ती प्रिंटिंग प्रेस चालवत होता, त्यामुळे याच प्रिंटिंग प्रेसचा वापर करून ते खोटे डॉक्युमेंट्स तसेच खोट्या नोटा तयार करायचे. आणि रबर स्टॅम्पचे दुकान चालवणाऱ्या इसमाच्या मदतीने यावर बँक स्टॅम्प उठूवून या नोटा खऱ्याच आहेत असा भास तयार करायचे.
प्रकरण उघडकीस कसं आलं?
तीन महिन्यांपासून या तिन्ही गुन्हेगारांचा खोटी एसबीआय(SBI) चालवण्याचा प्रकार सुरू होता. पनरुती भागातील एका बँक ग्राहकाने या खोट्या एसबीआय बद्दल शंका व्यक्त करत त्याच भागात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या खऱ्या बँक मॅनेजरकडे संपूर्ण प्रकरणाची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यानंतर झोनल अधिकारी त्वरित याची चौकशी करण्यासाठी निघाले (Fake SBI Branch).
लक्षात घ्या की पनरुती या भागात आधीपासूनच एसबीआयच्या दोन शाखा कार्यरत आहेत. आणि या तिघांकडून चालवलेली तिसरी शाखा ही पूर्णपणे खोटी असल्यामुळे बँकेच्या कुठल्याही कागदपत्रांमध्ये त्याची नोंदणी केली गेली नाही. अधिकारी याचा तपास करण्यासाठी बँक मध्ये पोहोचतात त्यांनी पाहिलं की तिन्ही गुन्हेगारांनी मिळून खोट्या एसबीआय(SBI)ला खरोखर बँक भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. ही खोटी एसबीआय खऱ्या बँकेचे प्रतिरूप होती. अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्याबाबत पोलिसांची संपर्क साधत या तिन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार या बँक मधून त्यांनी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही.