FASTag KYC: वाहनचालकांनो!! FASTag साठी KYC आहे अनिवार्य; नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल

FASTag KYC: वाहन चालकांनो लक्षात ठेवा की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने FASTag साठी KYC अनिवार्य केले असून आज 29 फेब्रुवारी 2024 ही KYC करण्याची अंतिम तारीख आहे. जर तुम्ही आजपर्यंत तुमच्या FASTag ची KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर 1 मार्च 2024 पासून तुमचा FASTag निष्क्रिय किंवा blacklist केला जाईल, याचाच अर्थ तुम्हाला टोल प्लाझावर दुप्पट टोल भरावा लागेल.

KYC नसेल तर भरावा लागेल दुप्पट पैसा: (FASTag KYC)

29 फेब्रुवारी 2024 ही तारीख लक्षात ठेवा कारण, या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या FASTag चं KYC अपडेट केलं नसल्यास तुमचं FASTag बंद होऊ शकतं. मग तुमच्या खात्यात पैसे असले तरीही तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही. NHAI (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) ने ‘One Vehicle, One FASTag’ अंतर्गत FASTag KYC अनिवार्य केलं आहे. FASTag द्वारे टोल भरणं सोपं आणि जलद होत आहे, त्यामुळेच वेळेवर KYC अपडेट करणं गरजेचं आहे.

जर तुम्ही तुमच्या FASTag चे KYC (Know Your Customer) अपडेट केले नसेल तर तुम्हाला टोल प्लाझावर दुप्पट टोल भरावा लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने टोल पेमेंटचा अनुभव सुधारण्यासाठी KYC अनिवार्य केले आहे (FASTag KYC). तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाइटवरून, बँकेच्या Mobile App द्वारे किंवा टोल प्लाझावर जाऊन FASTag चे KYC करू शकता.