बिझनेसनामा ऑनलाईन । महामार्गावरून प्रवास करणाऱ्या बहुतेकांना फास्टॅगची माहिती असते. राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर टोल टॅक्स वसूल करण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी FASTag चा वापर केला जातो. तथापि, लोकांना फास्टॅगबद्दल फक्त माहिती आहे की त्याद्वारे टोल टॅक्स भरता येतो. पण टोल टॅक्स भरण्याव्यतिरिक्त, फास्टॅगचा वापर इतर अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. फास्टॅगशी संबंधित काही छुपे फीचर्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे तुमच्यागाडीला FASTag असेल तर गाडी चोरीला गेल्यावर काही मिनिटांत तिचा शुद्ध घेणे FASTag मुले सोपे होते.
फास्टॅगमुळे तुम्हाला चोरांपासून संरक्षण मिळते –
फास्टॅगचे टोल नाक्यावर टोल प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच गाडीच्या सुरक्षेसाठीही महत्वाची भूमिका बजावते. FASTag तुमच्या कारला चोरीपासून वाचवते. हे वॉचमनप्रमाणे तुमच्या कारवर नजर ठेवते. FASTag मध्ये असणाऱ्या चीपमुळे गाडी चोरीला गेली तर ती सध्या कुठे आहे हे शोधणे शक्य होते. फास्टॅग हे एक प्रकारचे स्टिकरसारखे उपकरण आहे जे तुमच्या कारच्या पुढील आरशावर लावले जाते. तुमची कार टोल गेटवर पोहोचताच, स्कॅनिंगद्वारे तुमच्या डिजिटल वॉलेटमधून टोल टॅक्सची रक्कम कापली जाते. त्याचा संदेश तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही पाठवला जातो.
पोलिस तुमची कार शोधून काढू शकतात –
FASTag वर रेडिओ फ्रिक्वेन्सी देखील आहे. त्यामुळे पोलिसही तुमच्या फास्टॅग लावलेल्या कारचा सहज शोध घेऊ शकतात. जसे मोबाईल चोरीला गेल्यावर ट्रॅक केला जातो. त्याच प्रकारे, FASTag स्टिकर लावलेल्या कारला देखील ट्रॅक केले जाऊ शकते. परंतु यासाठी आपल्या कारवर स्थापित FASTag सक्रिय असणे आवश्यक आहे. चोरीची गाडी टोलनाक्यावरून जाताच तिचा शोध काढणे सोपे होईल. यासाठी तुमच्या कारवरील FASTag नेहमी एक्टिवेट ठेवावा लागेल.