FD Interest Rate Hike : नवीन वर्षांत ‘या’ 5 बँकांनी वाढवले FD वरचे व्याजदर; ग्राहकांना मिळालंय न्यू इयरचं दमदार गिफ्ट

FD Interest Rate Hike : आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि हे नवीन वर्ष सोबत काही नियम आणि बदल घेऊन आलं आहे. अगदी 2023 च्या शेवटच्या दिवसांपासून सरकार नवीन बदलांची घोषणा करीत होते आणि या बदलांची दाखल घेत आवश्यक सर्व नियम पाळणे हि सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी होती. त्या अनुषंगाने तुम्ही सर्व बदल नक्कीच घडवले असतील. मात्र केवळ सरकारी नियमच बदलले आहेत का? तर तसं नाही!! या नवीन वर्षात काही आनंदाच्या बातम्या देखील मिळाल्या आहेत. खास करून आता सुकन्या समृद्धी योजनते मिळणारा व्याजदर सरकारने वाढवला आहे, ज्याचा अधिकाधिक फायदा आता देशभरातील मुलींना मिळणार आहे. मात्र नवीन वर्षात होणारे बदल इथेच थांबत नाहीत. बँकिंग क्षेत्राने सुद्धा तुम्हाला नवीन वर्षाची भेट द्यायची ठरवली असून काही बँका FD वरचे व्याजदर वाढवत तुम्हाला अधिकाधिक परतावा मिळवण्यात मदत करणार आहेत. या बँका कोणत्या हे जाणून घेऊया..

कोणकोणत्या बँकांनी व्याजदरात केली वाढ- FD Interest Rate Hike

नवीन वर्षाच्या सुरुवातीला बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, DCB बँक आणि फेडरल बँक या पाच बँकांनी FD वर मिळणारे व्याजदर वाढवले (FD Interest Rate Hike) आहेत आणि म्हणूनच संबंधित बँकांच्या ग्राहकांना मोठा परतावा मिळवण्याची संधी मिळणार आहे. काय आहेत या बँकांचे नवीन दर जाणून घ्या.

१) बँक ऑफ बरोडा (BOB): अलीकडेच बँक ऑफ बरोडाने त्यांच्या व्याजदरांत वाढ केली आहे. बँक कडून वेगवेगळ्या मुदतींसाठी गुंतवणूक करण्यात येणाऱ्या ठेवींवर 0.10 ते 1.25 टक्क्यांची वाढ केली आहे. हि दरवाढ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD गुंतवणुकींसाठी बनवण्यात आली असून 29 डिसेंबर 2023 पासून हे नवीन दर बाजारात उपलब्ध झाले आहेत.

२) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): देशातील सुप्रसिद्ध बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया, सामान्य जनतेला सोयीस्कर ठरणारी अशी हि बँक गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. कोटक महिंद्रा प्रमाणे SBI ने देखील त्यांच्या ग्राहकांना 2 कोटींपेक्षा कमी FD गुंतवणुकीवर मिळणारे व्याजदर वाढवले आहेत. दरवाढ झाल्यानंतर SBI च्या ग्राहकांना आता 7 ते 45 दिवसांसाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर 0.50 टक्क्यांची सवलत मिळाली आहे. तसेच 46 ते 179 दिवसांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर बँकने 0.25 टक्के व्याजदर वाढवले आहेत. 180 ते 210 दिवसांसाठी केलेल्या FD गुंतवणुकीवर 0.50 टक्के व्याजदर वाढवून देण्यात आले असून आणि हे दर 27 डिसेंबर 2023 पासून देशभरात लागू झाले आहेत.

३) कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra): कोटक महिंद्रा बँक कडून तीन ते पाच वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवरचे व्याज दर वाढवण्यात आले आहेत(FD Interest Rate Hike). आता बँकच्या ग्राहकांना 2.75 टक्क्यांपासून ते थेट 7.25 टक्क्यांपर्यंत नवीन व्याजदर देऊ केले गेले आहेत, तसेच बँक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या वयस्कर माणसांसाठी 3.35 ते 7.80 टक्क्यांची दर वाढ करण्यात आली आहे. विविध गुंतवणुकीच्या मर्यादेनुसार हे व्याजदर बदलत जातील.

४) डीसीबी बँक (DCB): वरील बँकांप्रमाणे DCB बँकने देखील FD वर मिळणारे व्याजदर वाढवले आहेत. नवीन बदलांच्या अनुसार आता सात दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर मर्यादेनुसार 3.75 टक्क्यांपासून 8 टक्क्यांपर्यंत व्याज देऊ केलं जाणार आहे. बँकने वयस्कर लोकांसाठी देखील हि सवलत उपलब्ध केली असून त्यांना 4.25 ते 8.60 पर्यंत दरवाढीचा फायदा मिळणार आहे. हे दर बाजारात 13 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.

५)फेडरल बँक (Federal Bank): फेडरल बँक कडून 500 दिवसांसाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीवरचे व्याजदर वाढवण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांना आता 7.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढून देण्यात आले असून, वयस्कर लोकांसाठी हे दर 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तसेच हि बँक 21 महिने ते तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर सामान्य जनतेला 7.30 टक्क्यांचा व्याजदार देण्यात आला आहे तसेच वयोवृद्धांसाठी हा दर 7.80 टक्के असेल. आणि हे नवीन दर बाजारात 5 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.