Finance Minister Meeting: आगामी 26 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या विविध क्षेत्रातील startupच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत स्टार्टअप्सना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून, ‘फंडिंग विंटर'(Funding Winter) नावाचा काळ सुरू आहे ज्यामुळे स्टार्टअप्सना निधी मिळणे कठीण झालेय, यामुळे अनेक स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर कपात करावी लागली आहे तर काही स्टार्टअप्स बंद झाले आहेत आणि काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
भारतातील स्टार्टअप कंपन्या संकटात? (Finance Minister Meeting)
Paytm वर नुकतीच झालेली कारवाई आणि GSTच्या अडचणींमुळे स्टार्टअप्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून GST मुळे अनेक ऑनलाइन गेमिंग स्टार्टअप्सना (Online Gaming Startup) अडचणीचा सामना करावा लागतोय याचबरोबर, झोमॅटोला डिलिव्हरी चार्जवर GST भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आणि या सर्व घटनांमुळे स्टार्टअप्समध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्टार्टअप्सना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे?
GST मुळे स्टार्टअप्सवर आर्थिक बोजा वाढला आहे. त्यांना आता जीएसटी रजिस्ट्रेशन(GST Registration) करून, नियमितपणे रिटर्न भरावे लागणार असल्याने हे त्यांच्यासाठी खर्चिक आणि वेळखाऊ बनत चालले आहे. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे स्टार्टअप्ससाठी कठीण आहे. मोठ्या कंपन्यांकडे अधिक संसाधने आणि अनुभव असतो. स्टार्टअप्सवर अनेक नियम लागू केले जातात. हे नियम त्यांच्यासाठी पाळणे कठीण आणि खर्चिक बनते.
या सर्व प्रश्नांचा विचार केला तर अनेक स्टार्टअप्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांना पुरेसे निधी मिळत नाही आणि ते नफा कमावू शकत नाहीत(Finance Minister Meeting). स्टार्टअप्स भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. सरकारने त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.