Finance Ministry: चुकीच्या बातम्यांना अर्थमंत्रालयाचा पूर्णविराम; नव्या कर प्रणालीत बदल नाही

Finance Ministry: आर्थिक वर्ष 2024-25 पासून नवीन कर योजना ही Default कर योजना असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. सोशल मीडियावर नवीन कर योजना 1 एप्रिलपासून बदलणार असल्याच्या चुकीच्या बातम्या पसरत होत्या आणि यावर स्पष्टीकरण देताना सरकार म्हणाले आहे की, नवीन कर योजनेमध्ये कोणतेही बदल नाही करण्यात आले आहेत.

नवीन कर योजनेत बदल नाही: (Finance Ministry)

1 एप्रिल 2024 पासून, वैयक्तिक करदात्यांचा नवीन कर पद्धती लागू करण्यात आली आहे. ही नवीन कर पद्धती आता ‘Default’ कर पद्धत बनली आहे. म्हणजेच, करदात्यांना कोणती कर पद्धत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ते निवडता येते. जुन्या किंवा नवीन कर पद्धतीपैकी कोणतीही निवडण्याचा अधिकार करदातांना आहे. वित्त मंत्रालयाने(Finance Ministry) असेही स्पष्ट केले आहे की, ITR दाखल करण्यापर्यंत नवीन कर पद्धतीतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवीन कर नियमांनुसार, 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई करमुक्त आहे. 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर, 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर, तर 9 ते 12 लाख रुपये आणि 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर अनुक्रमे 15 टक्के आणि 20 टक्के कर लागू करण्यात आला आहे. 15 लाख रुपयांहून अधिक उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागणार आहे.

जुन्या कर योजनेत मात्र, भरपूर कर सूट आणि कपात करण्यात आली आहे. या योजनेनुसार, 2.5 लाख रुपयांपर्यंतची कमाई करमुक्त आहे. त्यानंतर 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के आणि 5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागतो. 10 लाख रुपयांहून अधिक उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागतो. तुम्हाला यापैकी कोणती कर योजना अधिक फायद्याची आहे त्याचा हिशोब करा आणि कर परतावा दाखल करताना तुमच्या सोयीनुसार योजना निवडा.