Financial Rule Changes: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरात बदललेत ‘हे’ नियम; RTI, UPI, Sim Card च्या ग्राहकांनी नोंद घेणे आवश्यक

Financial Rule Changes : आज म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून देशभरात काही आर्थिक नियम बदलणार आहेत. आणि देशाचे सुजाण, सुशिक्षित नागरिक असल्यामुळे तुम्ही याची दखल घेतलीच पाहिजे. नवीन वर्ष म्हटलं कि आपण नवीन जोमाने कामाला सुरवात करतो. जुनं झालेलं, घडून गेलेलं विसरून जात नव्या जोमानं सुरुवात करणं म्हणजेच नवीन वर्षाची खरी सुरुवात आहे. सरकार किंवा इतर कार्यरत संस्था हे सर्व बदल आपल्यासाठी म्हणजेच त्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी करत असतात त्यामुळे त्यांची दखल घेत आवश्यक असणारी पाऊलं आपल्याकडून उचलली गेली पाहिजेत. तसेच या नवीन बदलांमुळे आपल्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती करून घेत आवश्यक असलेलं नियोजन करण्यासाठी या नियमांची संपूर्ण माहिती असायलाच हवी. 1 जानेवारी 2024 पासून झालेले ‘हे’ नवीन आर्थिक बदल कोणते आज जाणून घेऊया..

1 जानेवारी पासून हे नियम बदलले आहेत: (Financial Rule Changes)

१) सिमकार्ड (Sim Card): आजपासून नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यामुळे मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. या नवीन नियमानुसार नवीन सिमकार्ड खरेदी करत असताना बायोमेट्रिकचे तपशील देणं अनिवार्य असणार आहे. तसेच आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे आणि सरकारकडून दूरसंचार कंपन्यांना डिजिटल KYC ची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

२) UPI खाते (UPI Account): आज म्हणजेच नवीन वर्षापासून उपयोगात नसलेले UPI अकाउंट बंद केले जाणार आहेत. गेल्या एक वर्षापासून वापरात नसलेले सर्व UPI अकाउंट नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून आजपासून बंद करण्यात येणार आहेत (Financial Rule Changes).

३) आयकर परतावा (Income Tax Return): आयकर विभागाकडून 31 डिसेंबर 2023 हि तारीख ITR भरण्यासाठी अंतिम तारीख असल्याचे स्पष्ट केले होते आणि या दिवशी कि या तारखेच्या पूर्वी इन्कम टेक्स रिटर्न भरणे हे प्रत्येक करदात्यासाठी अनिवार्य होते. त्यानुसार आजपासून अद्याप ITR न भरलेल्या करदात्यांविरुद्ध आयकर विभागाकडून दंड वसुली केली जाणार आहे.

४) पासपोर्ट आणि व्हिजा(Passport And Visa): आता नवीन नियमांनुसार परदेशात शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना नोकरी करण्यासाठी शिक्षण पूर्ण होण्या अगोदर व्हिजासाठी अर्ज भरावा लागणार आहे. याचाच अर्थ असा कि वर्क व्हिजाचा वापर करून कुठलाही विद्यार्थी परदेशात अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही.

५) डिमॅट अकाउंट (Demat Account): बँकिंग क्षेत्रात होणारा सर्वात मोठा बदल हा डिमॅट खात्यांच्या बाबत असेल. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून प्रत्येक बँक ग्राहकाला 31 डिसेंबर 2023 हि तारीख डिमॅट अकाउंटसाठी नॉमिनी जोडण्यासाठी मिळालेली अंतिम तारीख होती आणि असे न केलेल्या ग्राहकांचे बँक अकाउंट आता स्थगित केले जाऊ शकतात.