First Budget Of India : स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट कोणी सादर केलं? देशाची आर्थिक स्थिती त्यावेळी कशी होती?

First Budget Of India: फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या कारकिर्दीतला सहावं बजेट प्रस्तुत करणार आहेत. हे बजेट दोन वेगवेगळ्या सरकारच्या कारकिर्दीत समतोल साधण्यासाठी बनवलं जात असल्यामुळे इंग्रजीमध्ये याला इंट्रीम बजेट असंही म्हणून संबोधलं जातं. अर्थ मंत्रालयाकडून प्रस्तुत करण्यात येणारे बजेट हे देशाचं आर्थिक नियोजन ठरवत असतं. वेगवेगळ्या विभागाला कितपत खर्च करावा लागू शकतो याची माहिती मिळवली जाते, त्यावर विचार विनिमय करून अर्थ मंत्रालय प्रत्येक विभागाला ठराविक रक्कम खर्चासाठी देऊ करतं . देशाच्या हिताच्या दृष्टीने, तसेच देशाची आर्थिक घडी ही कायम व्यवस्थित राहण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून प्रस्तुत करण्यात येणारे बजेट हे सर्वात महत्त्वाचा असतं. मात्र कधी तुम्ही सर्वात पहिल्यांदा भारतात सादर करण्यात आलेल्या बजेट विषयी जाणून घेतलं आहे का? नसेल तर आज याबद्दल सविस्तर माहिती घेऊया…..

भारतात कधी सादर झालं सर्वात पहिलं बजेट?(First Budget Of India)

देशाची अर्थव्यवस्था कायम सुदृढ ठेवण्यासाठी बजेट म्हणजेच आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचं आहे. ऑगस्ट 2024 मध्ये भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण होतील. या मोठ्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था नेमकी कशी बदलत गेली हे उलगडून पाहूया. सध्या देशभरात निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी नाही तर काही महिन्यांसाठीच मोदी सरकारच्या अंतर्गत बजेट सादर केलं जाईल. सध्या भारत देश जोमाने प्रगती करीत असला तरीही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपली अर्थव्यवस्था कशी होती आणि तेव्हा नेमकं बजेट कोणी प्रस्तुत केलं हे पाहूयात.

भारतात 26 नोव्हेंबर 1947 रोजी पाहिलं बजेट प्रस्तुत करण्यात आलं होतं (First Budget Of India). स्वतंत्र भारताचं बजेट त्यावेळी अर्थमंत्री आर के षण्मुख शेट्टी यांनी सादर केलं होतं. आत्ताच्या काळात बनवण्यात येणारं बजेट आणि देशात बनवलेलं सर्वात पहिलं बजेट याचात जमीन आसमानाचा फरक आहे, कारण त्याकाळी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होत देशाचे घडी पुन्हा नीट बसवण्याचा प्रयत्न करीत होतो. वर्ष 1947 मध्ये ऑगस्ट महिन्यात भारत स्वतंत्र झाला आणि मग स्वतंत्र भारताला त्याचं पहिला बजेट नोव्हेंबर महिन्यात मिळालं.

बजेट सादर करताना काय होते षण्मुख शेट्टी यांचे शब्द?

त्या काळाचे वित्तमंत्री आर के षण्मुख शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट प्रस्तुत केलं होतं. ते देशाचे पहिलं बजेट असल्यामुळे तत्कालीन वित्तमंत्र्यांना ऐतिहासिक क्षण जगण्याचा आनंद मिळाला होता, जो कि त्यांनी आपल्या भाषणातून देशवासीयांसोबत व्यक्त केला होता. सर्वात पहिल्यांदा मांडण्यात आलेल्या बजेटचं ऑल इंडिया रेडिओ द्वारे प्रसारण करण्यात आलं होतं. (First Budget Of India).

स्वतंत्र भारताची त्या काळात आर्थिक परिस्थिती ही केवळ 2.7 लाख कोटी रुपये एवढीच होती. परकीय सत्तेने केलेल्या लुटीमुळे भारताला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत होता. कधीकाळी ज्या राष्ट्राची “इथून सोन्याचा धूर निघतो” अशी ख्याती गायली जायची तिथेच गरिबीने आपला कायमचा डेरा बसवला होता. स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटमध्ये( First Budget Of India) 171.15 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता तर वित्तीय तूट 26.24 कोटी रुपये एवढी होती.