Fitch Global Rating : फिचने व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास; यंदाच्या वर्षीही राहणार वाढीचा वेग कायम

Fitch Global Rating : भारताची अर्थव्यवस्था कमालीची कामगिरी बजावत आहे हे आपण सर्वजण जाणतोच, आणि म्हणूनच देश विदेशातील एजन्सीजकडून भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काही सकारत्मक अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता फिच या जागतिक रेटिंग एजन्सीने देखील भारतावर विश्वास दाखवलेला असून येणाऱ्या काळात भारत अधिकाधिक प्रगती करेल असे त्यांचे म्हणणे आहे. सादर केलेल्या अहवालात त्यांनी भारताचे BBB- हे रेटिंग कायम ठेवले असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था नक्कीच 6.9 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दिवसेंदिवस प्रगती करणारा देश अशी आपली जगभरात ओळख असली तरीही सध्या मोठमोठाले देश त्यांची अर्थव्यवस्था सुधारत असताना भारत मात्र प्रगतीचा जोर कायम धरून वावरत आहे.

काय सांगतो फिचचा अंदाज: (Fitch Global Rating)

सर्वात महत्वाचं म्हणजे फिच या जागतिक रेटिंग कंपनीला भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास बसला आहे, म्हणूनच त्यांनी भारताचे दीर्घकालीन विदेशी चलन इश्यूअर डीफॉल्ट रेटिंग ‘BBB-‘ राहील अशी घोषणा केली. तसेच या आर्थिक वर्षात भारत प्रगती करेल असा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यांच्या मतानुसार आर्थिक वर्ष 2024 नंतर भारतात वित्तीय मार्गांवरील निश्चितता कमी वाटते आणि आर्थिक वाढ आणि एकत्रीकरण यांच्यातील व्यापार-संबंध अधिक तीव्र होऊ शकतात. एजन्सीने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताचा GDP 6.5 टक्के असेल अंदाज व्यक्त केला होता, मात्र यंदाच्या वर्षासाठी त्यांनी GDP चा अंदाज 6.9 लावल्याने भारत नक्कीच प्रगती करत आहे हे सिद्ध होतं.

गुंतवणुकीबद्दल बोलताना फिचचे म्हणते की, देशात खासगी गुंतवणुकीची कोणतीही कमतरता भासणार नाही. आपल्या देशात हळूहळू खासगी गुंतवणुकीचे प्रमाण वाढणार आहे. कायम लक्ष्यात असुद्या की, देशाची आर्थिक स्थती मजबूत होण्यासाठी देशांर्गत होणारी गुंतवणूक अत्यंत महत्वाची असते. यंदाच्या वर्षी बँकांची स्थिती मजबूत असेल व कॉर्पोरेट बॅलन्स शीटमधील सुधारणा होईल आणि म्हणूनच गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण कायम असेल.

पुढे महागाईचा अंदाज व्यक्त करताना फिच म्हणते की, यंदाच्या वर्षाखेरीपर्यंत महागाईचा आकडा 4.7 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पॉलिसी रेटमध्ये 75 बेसिस पॉइंटने कपात करू शकते. त्यांनी सादर केलेला हा संपूर्ण अहवाल भारताच्या अर्थव्यवस्थेची सकारात्मक बाजू दाखवत असला तरीही एजन्सीने श्रमिक बाजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे(Fitch Global Rating) व महिलांच्या रोजगारासाठी सकारात्मक पावले उचलली जाणे अत्यंत महत्वाचे आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.