Fixed Deposit : कमावलेला पैसा सुरक्षित राहण्यासाठी आपण त्याची योग्य गुंतवणूक करून ठेवतो, जेणेकरून कठीण काळात किंवा म्हतारपणी त्याचा वापर करता येईल. गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जसं कि आपण सगळेच जाणतो रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून यावेळी रेपो दरांमध्ये (Repo Rate) कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. याचाच अर्थ असा कि बँक मध्ये ठेवलेल्या फिक्सड डेपोझीटवर (Fixed Deposit) जास्ती इंटरेस्ट मिळण्याची शक्यता नाही, तरीही गुंतवणूकदरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती कोणती हे पाहूयात…
कोणती बँक देतेय Fixed Deposit वर भरपूर इंटरेस्ट?
तुमच्याजवळ Fixed Deposit वर भरपूर व्याज मिळवण्याची हि उत्तम संधी आहे. स्मॉल फायनान्स सेक्टर मधील फिन्केअर स्मॉल फायनान्स (Fincare Small Finanace) हि बँक तुम्हाला Fixed Deposit वर चक्क 9.15 टक्क्यांचा वार्षिक परतवा मिळवून देऊ शकते. हि बँक देशातील सर्वोत्तम स्टेट बँक किंवा HDFC बँक यांच्यापेक्षाही जास्ती व्याज देते. फिन्केअर स्मॉल फायनान्स बँकच्या म्हणण्यानुसार ती सामान्य ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फिक्सड डेपोझीटवर 2 ते 8.51 टक्के व्याज देते. हाच आकडा जेष्ठ नागरिकांसाठी बदलतो, त्यांना फिक्सड डेपोझीटवर 3.60 ते 9.15 टक्के व्याज दिला जातो.
बँकचे व्याजदर खालील प्रमाणे आहेत:
बँक 30 महिने आणि 999 दिवसांसाठी 8% व्याज देत आहे, तसेच 36 महिने आणि एक दिवस ते 42 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.51%, 42 महिने आणि एक दिवस ते 59 महिन्यांच्या मुदतीवर बँक 7.50 टक्के व्याज देत आहे. जेष्ठ नागरिक या सेवेचा जास्ती फायदा मिळवू शकतात कारण इतरांच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या कालावधीच्या फिक्सड डेपोझीटवर (Fixed Deposit) 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळणार आहे.
कालावधी व्याज दर
7 ते 14 दिवस 2%
15 ते 30 दिवस 4.50%
31 ते 45 दिवस 4.75%
45 ते 90 दिवस 5.25%
91 ते 180 दिवस 5.75%
181 ते 365 दिवस 6.50%