Flight Ticket : काही दिवसांपूर्वी आपल्या देशात विमान सेवांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. काही नावाजलेल्या विमान कंपन्यांना वाईट स्थितीचा लागल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत होती, अनेक विमान कंपन्यांनी भल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना सहन केला होता. अगदी सणासुदीच्या काळातच विमान प्रवास महाग झाल्याने प्रवासी नाराज झाले होते. मात्र एवढ्या कठीण काळाला तोंड दिल्यानंतर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, येत्या काही दिवसांमध्ये देशभरात विमानप्रवास स्वस्त होऊ शकतो. Indigo ही सुरुवातीपासूनच सामान्य जनतेला परवडणारी विमान सेवा म्हणून ओळखली जायची, व आता या कंपनीने प्रवाशांच्या हितार्थ महत्वाचा निर्णय जाहीर केलेला असल्यामुळे काही दिवसांत विमान प्रवास स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे. याबद्दल एकूण माहिती सविस्तर जाणून घेऊया.
देशातील विमान प्रवास स्वस्त होणार? (Flight Ticket )
Indigo या विमान कंपनीकडून माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत देशातील विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपनी असलेल्या Indigo हवाई इंधनाच्या किमती कमी झाल्यानंतर इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ETSच्या किमतीत तीव्र वाढ झाल्याने इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर तेलाच्या किमती कमी झाल्या व परिणामी सरकारने देखील हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या. आता याचाच फायदा आपल्या ग्राहकांनाही व्हावा म्हणून प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
या संदर्भात माध्यमांना माहिती देताना Indigo म्हणते की, ही विमान सेवा ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत, वेळेवर, विनम्र आणि त्रासामुक्त प्रवास देण्यासाठी वचनबद्ध आहे. सध्या बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असल्यामुळे, देशात 75 रुपये प्रति बॅरलच्या किमतीने कच्च्या तेलाचा व्यापार सुरू आहे. या सवलतींचा फायदा अनेक कंपन्यांना होत असल्यामुळे ग्राहकांना देखील ही सवलत मिळावी म्हणून इंडिगो नवीन निर्णय जाहीर केला आहे.
ऑक्टोबर मध्ये इंधन शुल्क लागू करण्यात आले होते:
देशात हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर इंडिगोने देखील ऑक्टोबर 2023 मध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गावर उडणाऱ्या विमानांच्या किमतीवर 300 ते 1000 रुपयांपर्यंत इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि तेल कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हवाई इंधनाच्या किमतीमध्ये 4 टक्क्यांची घसरण करण्याचा निर्णय घेतला, याच परिणामी आता इंडिगो देखील हवाई प्रवासात इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे आणि म्हणूनच लवकरच देशभरात विमान प्रवास (Flight Ticket)स्वस्त होऊ शकतो.
इंधन आणि हवाई प्रवासाचा संबंध आहे का? नक्कीच आहे कारण हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर कंपन्यांचा खर्च वाढतो, ज्याच्या परिणाम ग्राहकांना जास्ती किंमत भरून चुकवावा लागतो. सलग तीन महिन्यांचा आढावा घेत तेल कंपन्यांनी आता कच्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण केली आहे म्हणूनच लवकरच इंडिगो देखील इंधन शुल्क हटवण्याच्या मार्गावर आहे.