Flight Tickets : इंधनाच्या किमतीत (Air Turbine Fuel) वाढ झाल्यामुळे याचा परिमाण विमानांच्या तिकिटांमध्ये होणार आहे. इंधनाच्या किमतीत 1 ऑक्टोबर पासून बदल पाहायला मिळाले. परिमाणी, देशातील विमान क्षेत्रात 60 टक्के आणि सर्वाधिक हिस्सेदारी असलेल्या इंडिगो (Indigo) विमान कंपनीच्या तिकिटांमध्ये फारच मोठा बदल झाला आहे. इंडिगो विमान कंपनीने आपल्या विमान प्रवासाची किंमत 300 ते 1000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. आणि हि दरवाढ देशात शुक्रवार म्हणजेच ६ ऑक्टोबर पासून लागू झाली.
आता विमान प्रवास करण्यासाठी लोकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. इंडिगो विमान कंपनीने तिकिटात दरवाढ केल्यानंतर आता बाकी विमान कंपन्या सुद्धा त्यांच्या किमतीत बदल करु शकतात असे संकेत मिळत आहेत. विमान सेवेचा एकूण खर्च पहिला तर त्यात इंधनचा खर्च हा 40 टक्के आहे आणि इंधन हे कोणतीही वाहतूक सेवा चालण्यासाठी अत्यावश्यक आहे. या इंधनाच्या किमतीत झालेली अचानक वाढ आता विमान सेवा महाग करवू शकते.
सणासुदीच्या काळात दरवाढ:
दिवाळी आता केवळ काही दिवस दूर आहे, त्याधी नवरात्र देशभरात साजरं केलं जाईल. अनेकजण नोकरी आणि कामासाठी वेगवेगळ्या प्रदेशात जातात आणि सण-उत्सवांच्या वेळी घरी परतात. डिसेंबरचा महिना हा ख्रिसमससाठी सुद्धा ओळखला जातो त्यामुळे अश्या गरजेच्या वेळेत झालेली हि दरवाढ अधिकतर लोकांना परवडणारी नाही.
येणाऱ्या काळात आणखी Flight Tickets महागणार:
भारतीय विमानसेवा सध्या बिकट परिस्थिती सोबत दोन हात करत आहे. गो-फस्ट (Go First) कंपनींच्या विमानांनी 2 मे पासून उड्डाण घेतलेलं नाही. तसेच अकासा एअर (Akasa Air) च्या 43 वैमानिकांनी नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे कंपनीकडून दहा मार्गांवरील विमान सेवा रद्द करण्यात आली. एकूणच देशात सध्या विमान सेवेची कमतरता सुरु आहे आणि सणांच्या काळात विमान सेवेची मागणी वाढणार असल्याने, वाढती मागणी आणि कमी असलेली सेवा यांमुळे विमान प्रवास (Flight Tickets). महाग होऊ शकते.