बिसनेसनामा ऑनलाईन । आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी तसेच काही महत्त्वांच्या गोष्टींसाठी आपल्याला पर्सनल लोन ची गरज असते. हे पर्सनल लोन घेण्यासाठी आपण बँकेत जाऊन रिक्वेस्ट करतो. नुकतंच RBI कडून आलेल्या पर्सनल लोन संबंधित MCLR मध्ये 0.15 टक्के वाढ केल्याच्या बातमीने ग्राहकांना मोठा धक्का बसला. यानंतर फ्लिपकार्ट ने यावर उपाय म्हणून एक निवेदन दिले आहे. त्यानुसार आता आपण ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरून पर्सनल लोन घेऊ शकतो.
फ्लिपकार्ट ने ॲक्सिस बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फ्लिपकार्ट च्या माध्यमातून पर्सनल लोन मिळू शकेल. याबाबत शुक्रवारी 7 जुलैला एका निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना ॲक्सिस बँकेकडून 3 वर्षापर्यंत 5 लाखाचे पर्सनल लोन दिले जाईल. त्याचबरोबर हे लोन फेडण्यासाठी ग्राहकांना 6 ते 36 महिन्यांचा कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये त्यांना आपले कर्ज फेडावे लागेल. या पर्सनल लोन मुळे ग्राहकांची परचेसिंग पावर वाढेल आणि खरेदी करणं सोप्प होईल असं या निवेदनात म्हणण्यात आलं आहे.
काय कागदपत्रे लागतील –
बँकेतून लोन घेण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रोसेस मधून जावं लागतं. पण फ्लिपकार्ट वरून घेण्यात येणारे पर्सनल लोन हे 30 सेकंदाच्या आत प्रोसिजर पूर्ण करून मिळेल. या पर्सनल लोन साठी ग्राहकांना काही डिटेल्स द्यावे लागतील त्यामध्ये पॅनकार्ड नंबर, जन्मतारीख, वर्क डिटेल, यानंतर ॲक्सिस बँक ग्राहकांची लोन लिमिट अप्रूव्ह करेल. यानंतर ग्राहक लोन अमाऊंट आणि रिपेमेंट मेथड चॉईस करू शकतील.
फ्लिपकार्ट चे फिनटेक अँड पेमेंट ग्रुप चे सीनियर व्हॉइस प्रेसिडेंट धीरज अनेजा यांनी याबाबत सांगितलं की, लीडिंग बँकिंग इन्स्टिट्यूशन यांच्यासोबत पार्टनरशिप केल्यानंतर अफोर्डेबल पेमेंट ऑप्शन सह ग्राहकांना सक्षम केलेलं आहे. त्याचबरोबर By Now Pay letter, EMI यासारखे ऑप्शन देखील देण्यात आलेले आहे. ॲक्सिस बँक सोबत केलेल्या पार्टनरशिप मुळे आता पर्सनल लोन सर्विस देखील ग्राहकांना मिळू शकेल.