Flipkart च्या सेलमध्ये Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळवा मोठी सूट

बिझनेसनामा । फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनान्झा सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जाते आहे. जर आपणही नवीन फोन घेणार असाल तर एकदा फ्लिपकार्टच्या वेबसाईट वरील मोबाईल बोनान्झा सेलला लगेचच भेट द्या. या सेलमध्ये Vivo चा T1x हा फोन 16,990 रुपयांऐवजी फक्त 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जातो आहे. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोनवर 11,050 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळू शकेल. या फोनची सर्वात खास गोष्ट अशी कि, यामध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर दिला गेला आहे.

कंपनीने स्मार्टफोनमध्ये 4 लेयर कुलिंग सिस्टीम दिली आहे. तसेच हा स्मार्टफोन ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध केला जाईल. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यामध्ये रिव्हर्स चार्जिंगसाठीही सपोर्ट दिला गेला आहे. या Vivo T1X मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा देखील समावेश आहे.

Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल सेन्सर असतील. तसेच सेल्फीसाठी या स्मार्टफोनच्या फ्रंट साईडला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यामध्ये सुपर एचडीआर, मल्टी-लेयर पोर्ट्रेट, स्लो मोशन, पॅनोरमा, लाइव्ह फोटो, सुपर नाईट मोड सारखे अनेक मोड उपलब्ध आहेत.

तसेच Vivo कडून या स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट वापरून इंटरनल स्टोरेज वाढवण्याचा पर्यायही दिला गेला आहे. Vivo चा हा स्मार्टफोन Android 12 आउट ऑफ द बॉक्सवर चालतो आहे.