Food Inflation: महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी तांदूळ निर्यात कर वाढवण्याचा सरकारचा विचार करणार का?

Food Inflation: जागतिक स्तरावर सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा भारत, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अन्नधान्याची महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, बसूदी तांदळावर लादलेला निर्यात कर आणखी वाढवू शकतो. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, यामुळे जगातील तांदळाचा पुरवठा घटेल आणि त्यामुळे तांदळाच्या किंमतीत बदल होण्याची शक्याता आहे.

तांदुळाच्या किमती बदलणार का? (Food Inflation)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा बाजी लावण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते सध्या उकडलेल्या तांदळावर असलेला निर्यात कर (20%) कायम ठेवण्याचा विचार करत आहेत, मात्र तांदुळाची निर्यात पूर्णपणे थांबवण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही.

सरकारने पुरवठ्याची खात्री करण्यासाठी आणि देशांतल्या तांदळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बिनबासमती तांदळाच्या निर्यातीवर शुल्क आकारले आहे. हे शुल्क 25 ऑगस्ट रोजी लागू झाले होते आणि 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे जाहीर केले. बिनबासमती पांढरा तांदूळ हा देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या एकूण तांदळाच्या सुमारे 25 टक्क्यांएवढा आहे.


भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीबद्दल गेल्या वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये चांगली बातमी समोर आली. या वर्षी बासमती तांदळाची विक्री 4.8 अब्ज डॉलर इतकी झाली असून, ती वस्तुमानच्या बाबतीत 45.6 लाख टन इतकी आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आनंद व्यक्त केला की सरकारच्या उपायमुळे महागाई नियंत्रणात आली आहे(Food Inflation). एप्रिल ते डिसेंबर 2022 मध्ये सरासरी 6.8 टक्के असलेली महागाई आता एप्रिल ते डिसेंबर 2023 मध्ये 5.5 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.