बिझनेसनामा ऑनलाईन | आपल्या देशासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, हुरेका लिस्टमध्ये सर्वात श्रींमंत व्यक्ती म्हणून नाव मिळवल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी फोर्बेसच्या यादीत सुद्धा पहिला क्रमांक मिळवला आहे. फोर्बेस आशियाने 100 श्रीमंत लोकांची यादी (Forbes List 2023) जाहीर केली आहे, यंदाच्या वर्षात मुकेश अंबानी याचं नाव यादीत सर्वप्रथम लागेलेलं आहे. अंबानी यांनी बनवलेला हा नवीन रेकोर्ड आहे. तर मग अंबानी यांची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात.
का आहेत अंबानी नंबर 1 (Forbes List 2023)
मुकेश अंबानी यांची रिलायंस कंपनी सर्वपरिचित आहे. या श्रीमंत माणसाची एकूण संपत्ती 92 अब्ज डॉलर्स एवढी आहे. भारतीय रुपयांमध्ये यांची गणना केली तर ती 7.65 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्ती आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर भारतातील अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आहेत. या वर्षात त्यांच्या संपत्तीत फार मोठी घसरण झाली आणि म्हणूनच त्यांचं नाव कदाचित अंबानींच्या खालोखाल आहे.गेल्या वर्षी मात्र गौतम अदानी पहिल्या स्थानावर होते, हिंडनबर्गच्या अहवालामुले या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, यानंतर त्यांची एकूण संपत्ती 82 अब्ज डॉलर्स वरून 65 अब्ज डॉलर्स झाली आहे.
बाकी यादीत कोणाचा समावेश होतो?
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर HCL चे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 29.3 अब्ज डॉलर्स आहे.यानंतर चौथ्या स्थानावर सावित्री जिंदाल आहेत ज्यांची एकूण संपत्ती 24 अब्ज डॉलर्स आहे.पाचव्या स्थानावर Dmart चे संस्थापक राधाकिशन दमाणी आहेत ज्यांच्या संपत्तीत घसरण होऊन हा आकडा आता 23 अब्ज डॉलर्स झाला आहे.
यानंतरच्या यादीत 20.7 अब्ज डॉलर्स सह पूनावाला सहाव्या स्थानावर आहेत, तर हिंदुजा 20 अब्ज डॉलर्स सह त्यांच्या मागे सातव्या स्थानावर आहेत.आठव्या स्थानावर दिलीप संघवी आहेत ज्यांची एकूण संपत्ती 19 अब्ज डॉलर्स आहे. 9 व्या स्थानावर 19 अब्ज डॉलर्स सह कुमार बिर्ला आहेत तर शेवटी दहाव्या स्थानावर शापूर मिस्त्री आहेत. यावेळी फोबर्सच्या यादीत (Forbes List 2023) नवीन नावांचा समावेश झाला आहे, एशियन पेंट्स 22व्या स्थानावर आहेत ( 8अब्ज डॉलर्स) रेणुका जग्तानी(4.8 अब्ज डॉलर्स) 44व्या स्थानावर आहेत.