Forbes List 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन ठरल्या शक्तिशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत 32 वे स्थान प्राप्त

Forbes List 2023 : आपल्या देशात अश्या अनेक स्त्रिया आहेत ज्या पुढे येत जगासमोर नवीन उदाहरण ठेवतात, महिला शिक्षण किंवा स्त्री सशक्तीकरण याबद्दल आपण अनेकवेळा चर्चा करतो. मात्र देशातील काही भाग असेही आहेत जिथे मुलींना शिक्षण घेण्याची, खुलेआम वावरण्याची संधी आजही मिळत नाही. अश्या कठीण स्थितीत देखील महिला डळमळत नाहीत किंवा हार मानून मागे फिरत नाहीत. प्रत्येक संकटातून मार्ग काढला जाऊ शकतो हि जन्मजात कला कदाचित त्यांना अवगत असावी. आपल्या देशाला कर्तबगार महिलांचा इतिहास देखील जोडलेला आहे आणि वर्तमानात देशाचे नाव जगभरात गाजवणाऱ्या अनेक महिला दिवसेंदिवस समोर येत आहेत. बाजार, बँक आणि आर्थिक जगात सर्वाधिक घेतलं जाणारं नाव म्हणजे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, निर्मला सीतारामन यांनी आपल्या कुशल कामगिरीच्या जोरावर अभिमास्पद कामगिरी करून दाखवली आहे. फोर्ब्सच्या यादीत त्यांना शक्तिशाली महिलांमध्ये 32 वे स्थान प्राप्त केलं आहे.

फोर्ब्सच्या यादीत अर्थमंत्री 32व्या स्थानी : (Forbes List 2023)

फोर्ब्स जगभरातील शक्तिशाली महिलांची एक यादी बनवतो. आणि प्रकाशित झालेल्या या यादीमध्ये आपल्या देशातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 32वे स्थान प्राप झाले आहे. या यादीत जगभरातील 100 कार्यकुशल आणि प्रभावशाली महिलांचा समावेश केला जातो. यादी तयार करताना जगभरातील राजकारण , व्यवसाय, वित्त, मिडिया आणि मनोरंजन अश्या विविध क्षेत्रांचा आढावा घेतला जातो. वय वर्ष 64 असलेल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना त्यांच्या राजकारणातील आणि विविध धोरणांमधील योगदानामुळे या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

निर्मला सीतारामन यांच्यासह भारतातील इतर महिलांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे (Forbes List 2023). तंत्रज्ञान क्षेत्रातील रोशनी नाडर या 60व्या स्थानी आहेत तर सेल्समधल्या सोमा मंडल आणि किरण मुझुमदार यांना 70 वे स्थान प्राप्त झाले आहे. निर्मला सीतारामन यांची वर्ष 2019मध्ये अर्थ मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यासोबतच त्या देशाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात.

Forbes List 2023 मध्ये अव्वल स्थान कोणाला

फोर्ब्सच्या या यादीत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेन यांनी पहिले स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर युरोपियन सेन्ट्रल बँकच्या अध्यक्षा क्रिस्टीन लागार्डे या आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॉररिस या तिसऱ्या स्थानावर असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या स्थानावर आहेत आणि पाचव्या स्थानी सर्वांच्या आवडत्या आणि जगप्रसिद्ध टेलर स्विफ्ट आहेत. फोर्ब्सच्या मते यावेळी त्यांनी युक्रेन आणि गाझा या भागांमधल्या मुलींचे शिक्षण, हक्क, सुरक्षा, आरोग्य, हिंसाचार इत्यादी घटकांच्या आधारे यादी (Forbes List 2023) तयार केली आहे.