Forbes List 2023 : नुकतंच फोर्बेस इंडियाची यादी समोर आली ज्यात त्यांनी विविध उद्योगांमधल्या उद्योगपतींसह 100 सर्वात जास्त श्रीमंत लोकांची यादी प्रकाशित केली. यात रिलायंस कंपनीचे मालक मुकेश अंबानी सर्वात पहिल्या स्थानावर आहेत, तर दुसरे स्थान गौतम अदानी यांनी मिळवले आहे. पण तुम्ही ती यादी नीट पहिलीत तर तुमच्या लक्षात येईल कि या यादीन पहिल्या 10 उद्योगपतींमध्ये एकमेव महिलेचा समावेश आहे. कोण आहे हि महिला आणि त्या नेमका कोणता व्यवसाय करतात पाहूयात…
Forbes List 2023 मध्ये असलेल्या त्या महिला कोण?
फोर्बेस (Forbes List 2023) हे एक जगविख्यात मासिक आहे. यात भारतातील 100 श्रीमंत उद्योजकांची यादी दिली जाते.मात्र या अब्जाधीशांमध्ये एका महिलेचे नाव पाहायला मिळते. या विराजमान महिलेचे नाव आहे सावित्री जिंदाल, त्यांच्या कंपनीमध्ये 46 टक्यांची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती 24 अब्ज डॉलर्स झाली आहे. सावित्री जिंदाल या एक जगप्रसिद्ध उद्योजिका आहेत. पतीच्या निधानंतर केवळ एकट्याने मेहनत करत त्यांनी आपला व्यवसाय वाढला आहे आणि बाकी महिलांसमोर उदाहरण ठेवले आहे.
सावित्री जिंदाल यांचा जीवन प्रवास:
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि आज एका प्रसिद्ध अंकाचा भाग असलेल्या सावित्री जिंदाल या कोणत्याही महाविद्यालयात गेलेल्या नाहीत. ज्या काळात सावित्री जिंदाल यांचा जन्म झाला तेव्हा स्त्री शिक्षणाला फारसं महत्व दिलं जायचं नाही. तेव्हा समाज अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडला होता, त्यामुळे इच्छा असून सुद्धा सावित्री यांना कधी शाळेत जाता आलं नाही, वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचे लग्न ओमप्रकाश यांच्याशी झाले जे कि तेव्हा 40 वर्षांचे होते. त्यांचे पती आणि जिंदाल समूहाचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांच्या मृत्यूनंतर व्यवसायाची धुरा त्यांनी आपल्या हातात घेतली आणि पतीचा व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेला.
लग्नानंतर सावित्री यांनी 9 मुलांना जन्म दिला, घर आणि व्यवसाय दोन्हीकडे समान लक्ष देत त्यांनी पतीच्या व्यवसायातही नाव कमावले. वर्ष 2005 मध्ये एका हेलीकोप्टरच्या अपघातात ओमप्रकाश जिंदाल यांचे निधन झाले. यानंतर पुढे जाण्यावाचून सावित्री यांच्यासमोर काही मार्ग उरला नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा कुटुंब आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी सांभाळत त्यांनी आपली यशस्वी घोडदौड सुरु केली.
.