Forbes List : दानवीर लोकांच्या यादीत नंदन निलेकणी आणि निखिल कामत यांचा नंबर; इतकी संपत्ती केली दान

Forbes List : एखाद्याजवळ भरपूर पैसा असला म्हणजेच तो माणूस श्रीमंत होत नाही तर त्याच्याजवळ असलेल्या पैशांपैकी किती रुपये दान करण्याची ताकद आहे यानुसारच त्याची श्रीमंती ठरत असते. आशिया खंडात फॉबर्स आशिया नावाची एक संघटना संपूर्ण अशिया खंडातील अशाच दानवीर उद्योगपतींची एक यादी तयार करते. आणि आता त्यांनी हीच एक यादी तयार केली आहे ज्यात आपल्या भारतातील अनेक दानवीरांची नावे सामील करण्यात आली आहे. यात सामील असलेल्या अनेक जणांपैकी महत्त्वाचे नाव म्हणजेच इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आणि झेरोधा कंपनीचे सहा संस्थापक निखिल कामत हे आहेत.

काय सांगते फॉबर्सची यादी: (Forbes List)

फॉबर्स ही संघटना एशिया खंडातील दानवीरांची यादी तयार करून प्रसिद्ध करत असते ज्याला एशिया हिरोज ऑफ फिलॉनट्रॉफी लिस्ट असं म्हटलं जातं. सध्या प्रदर्शित झालेली हि सतरावी यादी आहे, भारतातून सामील झालेल्या महत्त्वाच्या नावांमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी, DLF चे चेअरमन केपी सिंह आणि निखिल कामत यांचे नाव सामील आहे. या यादीत (Forbes List) नाव सामील होण्यासाठी भरगोस रक्कम दान करावी लागते. हे आशिया खंडातील काही परोपकारी उद्योगपती आहेत ज्यांनी कंपनीच्या व्यवहारा पुढे जाऊन देशातील आणि समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.

फॉबर्स लिस्ट मध्ये कोणाचे नाव आहे:

फॉबर्स लिस्ट मध्ये नाव असलेले नंदन निलेकणी यांनी जून महिन्यात आयआयटी बॉम्बे या संस्थेला 3.2 बिलियन रुपये म्हणजेच 38 मिलियन अमेरिकन डॉलर्स दान दिले आहेत. नंदन निलेकणी हे स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असून क्षेत्रात स्वतःचे नशीब आजमावू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी हे दान केले आहे. वर्ष 1999 पासून आतापर्यंत निलकेणी यांनी या संस्थेला एकूण 4 बिलियन रुपयांचे दान दिले आहे, याव्यतिरिक्त शैक्षणिक संस्थांना सुद्धा त्यांनी 1.6 बिलियन रुपये दान दिले आहेत.

नंदन निलेकणी नंतर DLF चे चेअरमन केपी सिंह यांनी वर्ष 2020 मध्ये DLF च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोडली तसेच रिअल इस्टेटमध्ये असलेल्या भागीदारीवरही त्यांनी पाणी सोडले. जवळपास 14 अरब अमेरिकी डॉलर्स अशा संपत्तीचे मालक असलेले केपीसीह यांनी स्वतःच्या चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट ची सुरुवात वर्ष 2020 मध्ये केली होती.

या यादीत असलेलं एक सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजेच निखिल कामत. त्यांनी जून महिन्यात गिविंग प्लेजमध्ये शपथ घेतली होती की ते जलवायू, परिवर्तन, ऊर्जा, शिक्षण आणि स्वास्थ्य या क्षेत्रांमध्ये देशाचे वृद्धी व्हावी म्हणून वेळोवेळी ते जमेल तशी रक्कम दान करतील. निखिल कामत त्यांच्या युट्युब पोडकास्ट द्वारे जमा होणारी रक्कम सुद्धा समाजाच्या भलाईसाठी वापरतात आत्ता जवळपास त्यांच्याजवळ 1.1 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी संपत्ती आहे ज्यामधले 40 मिलियन रुपये ते दान करण्याच्या विचारात आहेत.