FPI Investment: भारतीय बाजारावर परदेशी गुंतवणूकदार खुश; जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात 4000 कोटींची गुंतवणूक

FPI Investment : गेल्या वर्षभरात परदेशातून भारतीय शेअर बाजारात तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याला आपण इंग्रजीमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट (Foreign Portfolio Investment) किंवा FPI असं म्हणतो. मागच्या वर्षी एकूण गुंतवणुकी मधून 1.71 लाख कोटी रुपये शेअर्स मध्ये गुंतवण्यात आले होते आणि बाकी 68,663 कोटी रुपये कर्ज किंवा रोख बाजारामध्ये गुंतवले गेले आहेत. हा संपूर्ण आकडा पाहता गेल्यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात भली मोठी गुंतवणूक करण्यात आली होती हे स्पष्ट होते. आता हीच परंपरा यंदाही सुरु राहीली असून २०२४ च्या पहिल्याच आठवड्यात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये एकूण 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

पीटीआय(PTI) च्या माहितीनुसार भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार काही रक्कम गुंतवताना दिसतात. कदाचित ते इथून मिळणाऱ्या परताव्यावर खुश असतील म्हणूनच दिवसेंदिवस ते गुंतवणुकीचा आकडा वाढवत आहेत. वर्ष 2024 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये FPI कडून भारतीय शेअर बाजारात एकूण 4800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. आणि ही गुंतवणूक केवळ एका आठवड्याभरात करण्यात आली असल्याने भारतीय शेअर बाजाराला यामुळे भरपूरच फायदा मिळाला आहे.

याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांचा जर आपण डिपॉझिटरी डेटा पाहिला तर, या कालावधीत FPIs ने कर्ज किंवा रोख बाजारामध्ये 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे (FPI Investment). गेलं संपूर्ण वर्ष भारतीय बाजारासाठी अनुकूल होतं, कारण इतर क्षेत्राप्रमाणे परदेशी गुंतवणुकीचा आकडा देखील तेजीने वाढला होता. संपूर्ण 2023 वर्षाच्या आढावा घेतला तर एकूण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट कडून भारतीय शेअर बाजारात 2.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

डिसेंबर 2022 मध्ये देखील गुंतवणूकदार भारतावर खुश होते: FPI Investment

केवळ गेल्या वर्षीच नाही तर त्याआधी म्हणजे 2022 मध्ये देखील परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात चांगलीच गुंतवणूक करीत होते. गेल्या दोन महिन्यांत बाजारात झालेल्या विदेशी गुंतवणुकीशी तुलना केली तर, जानेवारी महिन्यात म्हणजे 5 जानेवारीपर्यंत भारतीय शेअर्समध्ये परदेशी गुंतवणूकदारांकडून 4,773 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्समध्ये 66,134 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, तर नोव्हेंबर 2023 मध्ये हा आकडा 9,000 कोटी रुपये होता.