FPI Investment: येत्या दोन दिवसात नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या तयारीत आहे पण मागे पडलेल्या आर्थिक वर्षा बाबत आम्ही तुम्हाला एक महत्वाची गोष्ट उलघडून दाखवणार आहोत. आर्थिक वर्ष 2023-24 शेअर बाजारात गुंतवण करणाऱ्यांसाठी सुवर्णाची संधी घेऊन आलं होतं. परदेशी गुंतवणूकदारांनी सतत केलेल्या जोरदार खरेदी आणि अनेक अनुकूल कारणांमुळे भारतीय शेअर बाजार नवी शिखरे सर करण्यात यशस्वी ठरला. जागतिक बाजारपेठ आव्हानोंना सामोरी जात असतानाही परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षी भारतीय शेअर बाजारात दोन लाख कोटींहून अधिक रक्कम गुंतवली, त्यामुळे आपल्या बाजाराने अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले.
परदेशी गुंतवणूकदारांकडून भारताला फायदा: (FPI Investment)
सध्या देशातील आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूक क्षेत्राबद्दल सकारात्मक संकेत मिळत असून परदेशी गुंतवणूकदार (FPI) भारताच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास उत्सुक दिसत आहेत. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत एफपीआय लोकांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 2.08 लाख कोटी रुपये आणि डेट मार्केटमध्ये 1.2 लाख कोटी रुपये अशी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे एकूण 3.4 लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक भारतीय भांडवली बाजारात केली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये FPI मधून लोकांनी भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतली होती(FPI Investment) पण आता त्यांचे हे जोरदार पुनरागमन भारतीय बाजारासाठी चांगली बातमी ठरली आहे.
मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहयोगी संचालक श्रीवास्तव यांनी संशोधन व्यवस्थापक यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणदारांकडून येणारा पैसा (Foreign Portfolio Investment – FPI) सध्या वाढत आहे. यामागे अनेक कारणं आहेत जसे की अमेरिका आणि इंग्लंडसारख्या विकसित देशातील महागाई आणि व्याजदरांची दिशा, चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक राजकीय परिस्थिती आणि भारताच्या अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती.