Frooti Success Story : अनेकांनी लहानपणामध्ये डोकावून पाहिलं तर फ्रुटी या शीतपेया शिवाय त्यांना बालपण अपूर्ण वाटेल. छोट्याश्या पॅकेटमध्ये मिळणारी फ्रुटी आपल्याला ताजतवानं करवायची. खास करून शाळा संपल्यानंतर रस्त्याच्या कडेकडेने चालणाऱ्या लहानग्या मुलांच्या हातात तर सूर्याच्या रणरणत्या उन्हात फ्रुटीचं पाकीट नक्कीच पाहायला मिळतं. गावात असो व शहरात कुठल्याही कार्यक्रमात फ्रुटी हे पेय नक्कीच असतं, मात्र कधी या फ्रुटीची गोष्ट जाणून घेतली आहेत का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला फ्रुटीच्या राज्यात घेऊन जाणार आहोत, तिथे जाणून घेऊया नेमकी याची सुरुवात केली तरी कुणी!!
अशी झाली फ्रुटीची यशस्वी घोडदौड: (Frooti Success Story)
वर्ष 1929 मध्ये मोहनलाल चौहान यांनी पार्ले ग्रुप्सच्या अंतर्गत फ्रुटी या पेयांची सुरुवात केली. आणि सध्या त्यांची नात म्हणेजच नादिया चौहान यशस्वीपणे या व्यवसायाची जबाबदारी उचलत आहेत. नादिया चौहान यांनी वर्ष 2003 मध्ये पार्ले ग्रुप्समधून करियरची सुरुवात केली होती. नादिया यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज कंपनी यशाची अनेक शिखरं काबीज करीत आहे, नादिया यांनी कंपनीची जबाबदारी संभाळली तेव्हा फ्रुटी केवळ 300 कोटी रुपयांचा नफा कमवत असे. मात्र आज नियोजन, मेहनत आणि चिकाटी या तिन्ही घटकांची एकत्र सांगड घालून केवळ 14 वर्षांत नादिया यांनी कंपनीचा नफा थेट 4200 कोटी रुपयांपर्यंत खेचून नेलाय. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 8000 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे.
अशी झाली फ्रुटीची सुरुवात:
वर्ष 1929 मध्ये मोहनलाल चौहान यांनी पार्ले ग्रुप्सची सुरुवात केली होती आणि त्यांच्या पश्चात हि जबाबदारी जयंतीलाल चौहान म्हणजेच त्यांच्या धाकट्या मुलाने सांभाळली. पार्ले ग्रुप्सच्या कार्यरत मालकीण आहेत नादिया चौहान, ज्या जयंतीलाल चौहान यांची नात आहेत. दिवसेंदिवस प्रगती करणाऱ्या या व्यवसायामधूनच थम्सअप(Thums Up), लिम्का(Limca), माझा(Maaza) इत्यादी अनेक नावाजलेल्या शीत पेयांचा उगम झाला होता, मात्र वर्ष 1990 मध्ये कोका-कोला (Coca-Cola) या जगप्रसिद्धीत कंपनी सोबत झालेल्या करारानंतर हे ब्रॅण्ड्स कोका-कोलाच्या हाती सुपूर्त करण्यात आले.
आत्ताच्या घडीला जयंती चौहान या पार्ले ऍग्रो या कंपनीची जबाबदारी सांभाळत आहेत आणि त्यांची बहिण म्हणजेच शौना चौहान या कंपनीच्या CEO आहेत. असं म्हणतात कि नादिया चौहान यांना लहानपणीपासूनच व्यव्यसायाची आवड होती आणि शाळकरी वयात त्या जास्तीत जास्त वेळ कंपनीचे कामकाज निरखण्यात घालवायच्या. वर्ष 2003 मध्ये कंपनीमध्ये काम सुरु करणाऱ्या नादिया यांचे वय केवळ 17 वर्ष होते. आत्ताच्या काळात तुम्ही Appy Fizz हे नाव नक्कीच ऐकलं असेल (Frooti Success Story), तर या प्रसिद्ध शीतपेयेची सुरुवात देखील नादिया यांनीच 2005 मध्ये केली होती आणि आता वर्ष 2030 पर्यंत हा व्यवसाय 20000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवणे हेच त्यांनी आपले ध्येय मानून वाटचाल सुरु ठेवली आहे.