Gaming : आजची तरुण पिढी गेमिगच्या क्षेत्रात सर्वात अधिक रमलेली दिसते. कॅम्पुटर समोर बसून खेळल्या जाणाऱ्या या गेमिंगचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. याच गेमिंगचे वेड असलेल्या मंडळींसाठी आजची हि बातमी आहे. गेमिंग क्षेत्रात सर्वात मोठा करार आता होणार आहे, Microsoft या कंपनीकडून आता एक्टीविजन ब्लीझार्ड हि कंपनी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. हि कंपनी जगप्रसिद्ध Candy Crush आणि Call Off Duty साठी ओळखली जाते. आता माय्रोसोफ्टने जर का या कंपनीची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली तर तरुण पिढीसाठी कदाचित हि सगळ्यात आवडती कंपनी ठरू शकते.
Gaming क्षेत्रातील सर्वात मोठं डील:
Microsoft कंपनी कडून एक्टीविजन ब्लीझार्डला विकत घेणं हि गेमिंगच्या जगातील सर्वात मोठी डील ठरणार आहे. ब्रिटनच्या कोम्पीटीशन एंड मार्केट्स ओथोरीटी या कंपनीमुळे हि डील काही दिवसांपासून अडकून राहली होती, क्लाउडगेमिंगला माय्क्रोसोफ्ट कंपनीमुळे नुकसान होईल म्हणून हि डील रोखून ठेवण्यात आली होती. मात्र आता कोम्पीटीशन एंड मार्केट्स ओथोरीटी (CMA) कडून या कराराला मान्यता मिळाल्यामुळे हि सर्वात मोठी डील होणार आहे आणि माय्क्रोसोफ्ट एक्टीविजन ब्लीझार्डला 68.7 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे.
अशी आहे डील:
Microsoft ने एक्टीविजन ब्लीझार्डला विकत घेतल्यानंतर त्यांना क्लाउड गेमिंगवरून आपले हक्क सोडावे लागणार आहे, कोम्पीटीशन एंड मार्केट्स ओथोरीटी (CMA) कडून परवानगी मिळवताना हीच अट सर्वात होती आणि माय्रोसोफ्टने याला होकार दिल्याने त्यांना परवानगी मिळाली आहे. Microsoft ला आपले हक्क सोडवे लागण्याचं प्रमुख कारण म्हणजे Xbox हा गेमिंग कन्सोल पूर्णपणे माय्क्रोसोफ्टच्या मालकीचा आहे आणि आता जर का त्यांना एक्टीविजन ब्लीझार्डचे संपूर्ण हक्क मिळाले असते तर गेमिंगच्या क्षेत्रात तेच सर्वेसर्वा होतील.
तसेच माय्रोसोफ्टने एक्टीविजन ब्लीझार्डचे आत्तापर्यंतचे आणि यापुढे 15 वर्ष येणारे गेमिंग राय्टस युबिसोफ्ट या कंपनीसोबत शेअर करण्याला होकार दिला आहे. माय्क्रोसोफ्टने हि कंपनी विकत घेतली तर मात्र गेमिंगच्या चाहत्यांना मोठा आनंद होणार आहे,कारण यानंतर कॉल ऑफ ड्युटी हि गेम (Gaming) अपडेट होऊ शकते.