Ganesh Chaturthi Bank Holidays : ‘या’ तारखांना बँका बंद; पहा संपूर्ण यादी

Ganesh Chaturthi Bank Holidays : आज संपूर्ण देशभरात बाप्पाचे आगमन झालं आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून आजपासून 11 दिवस गणरायाची मनोभावे पूजा केली जाणार आहे. खास करून महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीची लगबग सुरु आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक शाळा- कॉलेजना सुट्या मिळाल्या असून लहान मोठे सगळेच तयारीत गुंतले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का या दरम्यान देशातील विविध बँका सुद्धा बंद राहणार आहेत. आज आपण या बँक सुट्ट्यांच्या नेमक्या तारखा जाणून घेणार आहोत.

या दिवशी असतील बँका बंद (Ganesh Chaturthi Bank Holidays)

प्रत्येक वर्षी चतुर्थीची तयारी एकदम दणक्यात सुरु होते, आज सर्वत्र गणपतीचे आगमन झाले असल्याने सर्वजण गणरायाच्या सेवेत अगदी गुंग झाले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त देशातील बँका बंद असणार आहेत, त्यामुळे या तारखा लक्षात घेत आपली महत्वाची कामं करून घ्यावी. या मोठ्या उत्सवानिमित्त विविध भागांमध्ये 18,19 आणि 20 सप्टेंबर रोजी बँका बंद (Ganesh Chaturthi Bank Holidays) असणार आहेत. भारतातील सर्वोच्य बँक, म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ( Reserve Bank Of India) च्या आदेशानुसार खालील प्रमाणे बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.

18 सप्टेंबर: गणेश चतुर्थी- बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद.

19 सप्टेंबर : गणेश चतुर्थी- अहमदाबाद,बेल्पूर ,भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी.

20 सप्टेंबर : गणेश चतुर्थी ( दिवस २ )- भुवनेश्वर, पणजी.

गणेश चतुर्थीमुळे Stock Market बंद असेल का?

गणेश चतुर्थीमुळे बॉम्बे स्टोक एक्सचेंज ( Bombay Stock Exchange) आणि नेशनल स्टोक एक्सचेंज ( National Stock Exchange) यांमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. Stock Market बंद असणारा हा एकमेव दिवस असणार आहे.