Garib Kalyan Yojana : गरीब कल्याण योजनेत पडणार भर; भाजपचा सर्वात मोठा जाहीरनामा

Garib Kalyan Yojana : काही दिवसांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत अन्न पुरवठा करण्याचे वचन दिले होते. या त्यांच्या मोठ्या वक्तव्यानंतर सरकारच्या तिजोरीवर किती गंभीर परिणाम होऊ अश्या अनेक चर्चांना उत आला. आता देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांचे वातावरण असताना भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. भाजपचे अध्‍यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या या मोठ्या विधानाचा फायदा पुन्हा एकदा राशन कार्ड धारकांना होणार आहे. मध्य प्रदेश मध्ये चाललेल्या निवडणुक मोहिमे मध्ये नड्डा यांनी मोठे वक्तव्य केले, काय म्हणाले भाजपचे अध्यक्ष जाणून घेऊया..

संकल्प पत्रात काय म्हणाले नड्डा : Garib Kalyan Yojana

मध्य प्रदेशात चालेल्या निवडणूक मोहिमेत नड्डा यांनी एक संकल्प पत्र जारी केले, त्या संकल्प पत्रात भाजपचे अध्यक्ष म्हणतात कि देशातील रेशन कार्ड धारकांना गरीब कल्याण योजने अंतर्गत (Garib Kalyan Yojana) मदत केली जायची, ज्या मध्ये गहू, तांदूळ आणि डाळ अशी महत्वाची धान्य देऊन गरीब जनतेच्या गरजा भागवल्या जायच्या. मात्र आता यात अजून वाढ करण्यात येणार आहे. अजून दोन पदार्थ वाढवून यात सामावले जातील ते म्हणजे मस्‍टर्ड ऑयल आणि साखर. देशातील गरजू जनतेला फायदा व्हावा म्हणून कार्यरत असलेल्या सरकार कडून हा मोठा निणर्य घेण्यात आला आहे असं ते म्हणाले. मात्र भाजप अध्यक्षांचं संकल्प पत्र इथेच थांबत नाही, त्यांनी याच लाभार्थी वर्गाला 450 रुपयांमध्ये घरगुती सिलिंडर देण्याचे वचनही देऊ केले आहे.

संकल्प पत्रात काही भाग हा महिलांसाठी सुद्धा राखीव ठेवण्यात आला होता, ज्यात नड्डा यांनी महिलांना लाडली बहन या योजने अंतर्गत सुव्यवस्थित घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन (BJP Manifesto) दिले आहे, ते म्हणाले कि याआधी देखील भारत सरकारकडून महिला आणि बाल कल्याणासाठी प्रयत्न केले जायचे आणि आता भाजपाकडून हि परिस्थती सुधारण्यासाठी आणखीन प्रयत्न केले जातील. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी गरीब कल्याण योजनेत मुदत वाढ केली होती, आणि आता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यात भर घातली आहे.