Garlic Price Hike : कांदा- टोमॅटो नंतर आता लसणाच्या किमतीत मोठी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला चाप

Garlic Price Hike : देशात महागाईवर जरी आपण काही प्रमाणात आळा घातलेला असला तरीही काही वस्तू महागाईचा उचांक गाठत आहेत. जेवणाच्या ताटात अत्यंत आवश्यक मानल्या जाणाऱ्या कांदा आणि टोमॅटो यांच्या किमतींनी काही दिवसांअगोदरच दर वाढ केल्यामुळे सामान्य माणसाचं महिनाभराचं पूर्ण गणितच बिघडून गेलंय. कांदा आणि टोमॅटो ह्या अत्यावश्यक गोष्टी असल्यामुळे त्यांच्याशिवाय जेवणाचं ताट अपूर्ण आहे, म्हणूनच कधी गरजेला थोडीशी कात्री लावत, विक्रीच्या दरम्यान यांची कॉन्टिटी कमी करून खरेदी केली जाते. अत्यंत बिकट परिस्थिती असलेला माणूस तर यांकडे ढुंकूनही बघत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का कांदा आणि टोमॅटो यांच्या रांगेत आता लसूण देखील येऊन बसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे.

काय आहेत लसूणीचे नवीन भाव (Garlic Price Hike):

आपल्याकडे कोणत्याही पदार्थाला लसणाचा तडक दिला की त्याची चव द्विगुणीत होते. काही लोकांना तर भाकरीबरोबर कांदा आणि लसूण खायला आवडतात. पण आपल्या आवडीवर आता थोडासं बंधन आणावं लागणार आहे, कारण कांदा आणि टोमॅटो यांच्याप्रमाणे लसणाचेही भाव वाढवायला सुरुवात केली आहे. बाजारातील आकडे सांगतात की लसूण दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चालला आहे . सध्या रिटेल बाजारात लसणाचा भाव शंभर रुपयांनी वाढल्यामुळे नवीन किंमत 300 रुपयांवरून 400 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

आधी टोमॅटो त्यानंतर कांदा आणि आता शेवटी लसुणीनेही जनसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली आहे. टोमॅटोचे भाव कुठेतरी थोडेसे आटोक्यात आलेले असले तरी अजून कांद्याचे दर उतरवण्याच्या विचारात दिसत नाही आणि अशा परिस्थितीत बाजारातील आकडे सांगतात की या महिन्यात लसणाच्या किमती देखील वाढणार आहेत (Garlic Price Hike).

लसणाच्या किमती वाढण्याचे कारण काय?

लसूण हे प्रामुख्याने महाराष्ट्रात पिकवल जाते. नाशिक आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये पर्यावरणात झालेले बदल या पिकाला नष्ट करत आहेत. बाजारात विक्रीसाठी पुरेस पीक उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांना दुसऱ्या राज्यांमधून पिकाची मागणी करावी लागते. आपण जेव्हा एखाद्या दुसऱ्या भागातून वस्तूंची आयात करतो तेव्हा त्यावर जास्त प्रमाणात लॉजिस्टिक कर भरावा लागतो आणि म्हणूनच सध्या लसणाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे (Garlic Price Hike). अद्यापतरी नवीन पीक तयार होण्यास बराच अवधी जाऊ शकतो आणि म्हणूनच तोपर्यंत सामान्य जनतेला पोटाला चिमटा काढून जगावं लागेल.

थंडीच्या काळात लसूणीचा तडका प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो पण बाजारातील भावांनी थंडीची मजाच घालवली आहे, या मोसमात लसणाच्या भावांमध्ये 100 रुपयांची वाढ झाल्यामुळे नवीन किमती 300 वरून थेट 400 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. आतापर्यंत होलसेल यार्ड मध्ये लसूण 100 ते 150 रुपये प्रति किलोच्या दराने विकली जायचे पण त्यातही वाढ झाल्यामुळे आता 150 ते 250 प्रति किलो या दराने लसूण खरेदी करावी लागणार आहे.