बिझनेसनामा ऑनलाईन । आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट दिले आहे. २ दिवसांपूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडर (Gas Cylinder Price) वर २०० रुपयांची आणि उज्वला योजनेअंतर्गत ४०० रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. आता सरकार कडून कमर्शियल गॅसच्या किमतीत सुद्धा तब्बल १५७ रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किमती अपडेट केलया आहेत. यावेळी सरकार कडून गॅसच्या किमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सुद्धा 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे सलग २ महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्यामुळे हॉटेल चालकांसाठी मोठा दिलासा आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ऑगस्टमध्ये 1680 रुपये होते, आता तुम्हाला यासाठी 1522.50 रुपये मोजावे लागतील.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कोणत्या शहरात किती रुपये– (Gas Cylinder Price)
दिल्ली – १५२२.५० रुपये
कोलकाता -१६३६ रुपये
मुंबई- 1482 रुपये
चेन्नई- १६९५ रुपये
दरम्यान, राखीपौर्णिमेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किमतीत (Gas Cylinder Price) २०० रुपयांची सबसिडी जाहीर केली होती तसेच उज्वला योजनेअंतर्गत गॅसच्या किमती सुद्धा ४०० रुपयांनी स्वस्त करत देशातील महिलांना रक्षाबंधनाचे गिफ्ट दिले होते. त्यानुसार, घरगुती एलपीजी सिलिंडरची आज किंमत पुण्यात 906.00 रुपये आहे. औरंगाबादमध्ये 14.2 किलो सिलेंडरसाठी रु 911.50 रुपये मोजावे लागतील, तर अहमदनगर 916.50, अकोला 923आणि अमरावती येथे गॅस सिलिंडर 936.50 रुपयांत मिळेल.